नांदेड

नायगाव नगर पंचायत निवडणुकीसाठी आरक्षण घोषीत

नांदेड(प्रतिनिधी)- नायगाव नगर पंचायतीच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. प्रभागनिहाय यावर झालेल्या आरक्षण सोडतीची माहिती नायगावचे उपविभागीय अधिकारी महेश जमदाडे यांनी प्रसिध्द केली आहे.
नायगाव नगर पंचायतीच्या राजकीय आरक्षण सोडतीमध्ये 2011 च्या जनगणणेनुसार 16719 मतदार आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातीचे मतदार 3784, अनुसूचित जमातीचे मतदार 780 आहेत. यामध्ये नगर पंचायतीची एकूण सदस्य संख्या 17 आहे. त्यात अनुसूचित जातीसाठी 4 जागा राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आरक्षीत आहे. नागरीकांच्या मागासप्रवर्गासाठी 3 जागा राखीव आहेत आणि सर्वसाधारण अर्थात अ राखीव जागा 9 आहेत.
अनुसूचित जाती व जमातीसाठी सोडतीमध्ये सुटलेेले प्रभाग क्रमांक-8- रोहिदास नगर, 3 -सहयोगनगर,2-बळवंतनगर, 15-कल्याणगल्ली, अनुसूचित जाती महिलांसाठी क्रमांक 3 आणि 15 राखीव आहे. अनुसूचित जमाती महिलेसाठी मद्देवाड गल्ली अमृतनगर हा प्रभाग आरक्षीत झाला आहे. बळगेनगर-1, सिध्दार्थनगर-4, व्यंकटेशनगर-6, जावईनगर पुर्व-7, जुनी झोपडपट्टी-10, महात्मा फुले कॉलनी-11, भाजीपाला मार्केट-13, चव्हाण गल्ली-16, दत्तनगर, शंकरनगर -17 हे 9 प्रभाग मागास प्रवर्गातील नागरीकांसाठी आरणाच्या सोडतीत होते.  त्यात जावईनगर, महात्मा फुले कॉलनी, दत्तनगर हे प्रभाग मागासप्रवर्गासाठी आरक्षीत आहेत.   यात प्रभाग क्रमांक 17 दत्तनगर हा प्रभाग महिलेसाठी राखीव आहे. अनुसूचित जाती जमाती व मागास प्रवर्गातील आरक्षण झाल्यावर बेळगेनगर-1, सिध्दार्थ नगर-4, विठ्ठलनगर -5, व्यंकटेशनगर-6, पानसरेनगर-9, जुनी झोपडपट्टी-10, वसंतनगर -12, भाजीपाला मार्केट परिसर-13 आणि चव्हाण गल्ली-16 हे प्रभाग अराखीव आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी चार प्रभाग राखवी आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.