जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.आज फक्त नवीन कोरोना रुग्ण सापडला आहे.
मनपा गृह विलगीकरणातून -०३ उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७७४५ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.०३ टक्के आहे.
आज ३०२ अहवालांमध्ये ३०१ निगेटिव्ह आणि ०१ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९०४२८ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ०१ आणि अँटीजेन तपासणीत ०० असे एकूण ०१ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी ०० अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ०० आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०० आहेत. आज सापडलेले नवीन रुग्ण मनपा-०१,असे आहेत.