नांदेड

बोरा, अनंतवार आणि जैन या खंडणीखोरांनी कोणाला त्रास दिला असेल तर तक्रार नोंदवा-निसार तांबोळी

नांदेड(प्रतिनिधी)-जनता, शासकीय अधिकारी आणि व्यापारी यांना  नांदेड पोलीस परिक्षेत्रात पवन बोरा, दत्तात्रय अनंतवार आणि गौतम जैन यांनी खंडणी मागितली असेल, त्रास दिला असेल तर  त्याबाबत प्रत्येकाने तक्रार द्यावी तक्रारदारांचे संरक्षण करण्याची मी ग्वाही देतो असे नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी सांगितले. 
आज दि.8 नोव्हेंबर रोजी निसार तांबोळी पत्रकारांसमक्ष बोलत होते. नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा क्रमांक 397 हा मुळ विषय होता. त्याबाबत निसार तांबोळी यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या भागातील जनता, व्यापारी आणि शासकीय अधिकारी यांना गुन्हा क्रमांक 397 मधील आरोपी पवन जगदीश बोरा उर्फ शर्मा, दत्तात्रय पांडूरंग अनंतवार आणि गौतम नरसींगदास हिरावत उर्फ गौतम जैन यांनी कांही त्रास दिला असेल, खंडणी मागितली असेल त्याबाबत पोलीसांकडे तक्रार द्यावी आणि पोलीसांच्या कामाला मजबुती येईल असे करावे. या सर्व तीनही आरोपींच्या ईतिहासाची तपासणी आम्ही केली आहे. त्यात त्यांनी अनेकांना त्रास दिल्याची माहिती पोलीसांकडे उपलब्ध आहे. आरोपी सध्या फरार आहेत. त्याबाबत त्यांचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. त्यातील एकाकडे अग्नीशस्त्र आहे. ते सुध्दा जप्त करण्यात येईल. 
गुन्हा दाखल झाल्यानंतर कांही ठिकाणी केलेल्या तपासणीमध्ये अशी अनेक कागदपत्र सापडली आहेत.तसेच बंदुकीच्या गोळ्या सापडल्या आहेत. ज्यावरून त्यांनी अनेकांना त्रास दिल्याचे दिसते. त्रास दिलेल्या सर्व लोकांनी पोलीसांकडे यावे आम्ही त्यांना सुरक्षीतता देवू आणि त्यांचे नाव सुध्दा गुप्त ठेवू असे निसार तांबोळी म्हणाले. या आरोपींकडून किंवा त्यांच्या हस्तकांकडून कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेवू असे निसार तांबोळी म्हणाले. एका प्रश्नाच्या उत्तरात निसार तांबोळी यांनी सांगितले की, कोणाचेही वाहन रोखण्याचा अधिकारी कोणाला नाही,  कोणाच्या संपत्तीमध्ये जाण्याचा अधिकार कोणाला नाही, कोणाच्या घरात कोणाला जाण्याचा अधिकार नाही असे कोणी करत असेल तर त्याबाबत माहिती द्या आम्ही त्यांच्यावरही गुन्हे दाखल करू. तसेच जनता, व्यापारी  आणि शासकीय अधिकारी यांना सुरक्षा देवू. दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात निसार तांबोळी यांनी सांगितले की, गुन्हा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही. सोबतच ज्यांच्याकडे पोलीस सुरक्षा आहे त्या सर्वांची तपासणी सुरू आहे. त्यांना सुरक्षा कायम ठेवावी किंवा काढून घ्यावी याचे तपासणी होत आहे. त्या तपासणीनुसार त्यांची सुरक्षा कायम ठेवावी की, नाही याचा निर्णय होईल असे निसार तांबोळी म्हणाले. 
गुन्हा क्रमांक 397 चा आरोपी पवन जगदीश बोरा हा काल दि.7 ऑक्टोबर रोजी हिंगोली शहरात होता. 6 ऑक्टोबर रोजी त्याने एका दुकानातून काही साहित्य घेतले व त्यानंतर त्या दुकानदाराने त्याला पकडून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात नेले होते. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज हिंगोली शहर पोलीस ठाण्यात उपलब्ध आहेत. याबाबत निसार तांबोळी यांनी कोणत्या महान पोलीस अधिकाऱ्याच्या आदेशाने पवन बोराला सोडण्यात आले याची सुध्दा तपासणी करावी म्हणजे नवीनच सत्य त्यातून बाहेर येईल. 7 ऑक्टोबर रोजी सुध्दा पवन बोराला हिंगोली शहरातील देवडानगर भागात अंतरवस्त्रांवर उभा होता असे अनेकांनी पाहिले होते. त्याचाही शोध होण्याची गरज आहे. 
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *