प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.आज चार नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
मनपा गृह विलगीकरणातून -०३ रुग्णाला उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७७३८ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.०३ टक्के आहे.
आज ३८६ अहवालांमध्ये ३७७ निगेटिव्ह आणि ०४ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९०४४२ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ०४ आणि अँटीजेन तपासणीत ०० असे एकूण ०४ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी ०० अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ०५ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०० आहेत. आज सापडलेले नवीन रुग्ण मनपा-०२,भोकर-०१,उदगीर-०१,असे आहेत.