नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात खासगी व्यक्तींना दिलेल्या पोलीस सुरक्षेची पडताळणी सुरू झाली आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एका पत्राच्या आधारावर दिलेल्या सुरक्षेचे पुर्नअवलोकन करण्यास संबंधीत पोलीस ठाण्यांना सांगितले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक खाजगी व्यक्तीला दिलेली सुरक्षा आणि त्याची तपासणी होणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यांना आवश्यक आहे. त्यांना ती पुन्हा पुरवली पाहिजे. ज्यांना आवश्यकता नाही त्यांच्याकडून ती सुरक्षा काढून घेतली पाहिजे. कारण शासनाचे मनुष्यबळ आणि शासनाचा पैसा वाया जाणारा थांबेल.
नांदेड शहरात आणि जिल्ह्यात अनेक खाजगी व्यक्तींना पोलीसांनी सुरक्षा पुरवलेली आहे. त्यासाठी कांही जणांना एक शस्त्र सुरक्षा रक्षक पोलीस तर कांही जणांना दोन सुरक्षा रक्षक पोलीस देण्यात आले आहेत. ज्यांना खरीच सुरक्षेची आवश्यकता आहे. त्यांची सुरक्षा कायम राहावी यात कोणाचे दुमत असू शकत नाही पण कांही लोकांनी आयडीया लडवून मिळवलेले सुरक्षा रक्षक परत घेतले पाहिजे. कारण सुरक्षा सुरक्षकांच्या जोरावर त्यातील कांही मंडळी बेकायदेशीर व्यवसायवाल्यांकडून वसुली सुध्दा करतात असे लक्षात आले आहे. कांही जणांना हरविंद्रसिंघ संधू उर्फ रिंदा याने धमकी दिल्यामुळे सुरक्षा रक्षक देण्यात आला. कांही दिवसांपुर्वी रिंदाने दिलेली एक मुलाखत प्रसिध्द झाली होती. देशाच्या वरिष्ठ तपास संस्थांनी त्याचा शोध लावला होता त्यानुसार रिंदा सध्या पाकिस्तानात आहे. मग त्याच्याकडून कोणाला धोका कसला आहे.
मागे पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी एकाचा काढलेला सुरक्षा रक्षक परत मिळविण्यासाठी त्यात झालेले अकांड तांडव जिल्ह्यातील बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांना माहित आहे. अकांड तांडवानंतर पुन्हा सुरक्षा रक्षक मिळाला पण आता तर त्याला सुरक्षा रक्षक आहे असे म्हणतांना पोलीसांना सुध्दा लाच वाटेल अशी परिस्थिती आहे. पण या सुरक्षा रक्षक तपासणीची कामे अत्यंत पारदर्शकपणे होणे आवश्यक आहे. नाही तर आवश्यक नसतांना पुन्हा सुरक्षा मिळाली तर त्याचा उपयोग काय होईल या बाबत संदर्भ लिहिणे अवघड आहे.
