नांदेड

145 दिवसांनंतर विजय कबाडे आणि दिप्पा चांगले काम करतात याची उपरती रणदिपसिंघला झाली

दिवाळीच्या दिवशी वजिराबाद पोलीस ठाण्यात दिली खुलासा
नांदेड (प्रतिनिधी)- अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि त्यांच्या खास विश्वासातील पोलीस अंमलदार राजदिपसिंघ यांच्याविरूद्ध दिलेल्या अर्ज माझी मानसिकता बरोबर नसल्याने दिला होता अशी उपरती अर्जदार रणदिपसिंघ ईश्वरसिंघ सरदार यांना दिवाळीच्या दिवशी झाली आहे. पोलीस ठाणे वजिराबाद येथे त्यांनी अर्ज दिलेला आहे. या अर्जाच्या प्रती ह्युमन राईट कमिशन, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री यांच्यासह 12 जणांना देण्यात आल्या आहेत.
दि. 4 नोव्हेंबर दिवाळीच्या दिवशी रणदिपसिंघ ईश्वरसिंघ सरदार याने वजिराबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जानुसार त्यांनी 12 जून 2021 आणि 19 जून 2021 या दोन दिवशी दिलेले अर्ज नांदेड जिल्ह्यातील अत्यंत कर्तव्यदक्ष, कर्दनकाळ अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदार राजदिपसिंघ (दिप्पा) यांनी मला नाहक त्रास दिल्याची तक्रार अनेक लोकांना केली होती. ती तक्रार वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा छापून आली होती. आता मात्र रणदिपसिंगला उपरती झाली आणि त्याचा खुलासा या अर्जाद्वारे करण्यात आला आहे.
आपल्या अर्जात रणदिपसिंघ लिहितात, माझ्याकडून अनावधानाने झालेल्या चुकीमुळे विजय कबाडे आणि दिप्पा यांना नाहक त्रास झाला त्यासाठी मी दिलगीरी व्यक्त करत आहे. माझी चुक नसताना 29 मार्च 2021 रोजीच्या घटनेत गुन्हा क्र. 114/2021 मध्ये घटनेच्या 77 दिवसांनंतर कोणीतरी सुडबुद्धीने माझे नाव गोवले आहे. त्यावेळी माझ्यात आलेल्या डिप्रेशनमुळे माझी मानसिक स्थिती बरोबर नसल्याने पोलीस अधिकाऱ्यांची नावे टाकून मी ते दोन अर्ज दिले होते. मी त्या अर्जांमध्ये केलेल्या आरोपांबद्दल माझ्याकडे कसलाही पुरावा नाही.
मी सन 2017 ते 2019 दरम्यान हजुरी खालसा फायन्सास चालवत होतो. त्यावेळी माझे भागीदार असलेले लोक यांच्याबाबतही माझा काही वाद नाही. सध्या माझा त्यांच्याशी काही संबंध नाही. पोलीस अधिकारी आपआपले काम संपुर्ण जबाबदारीने व इमानदारीने करीत आहेत. गुन्हा क्र. 114/2021 मध्ये अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व अंमलदार दिप्पा यांची कोणतीही चुक नाही. पोलीस अधिकाऱ्यांना झालेल्या नाहक त्रासाबद्दल व माझ्या चुकीमुळे त्यांच्या झालेल्या बदनामीबाबत मी जाहीर दिलगिरी व्यक्त करीत आहे.
काही दिवसांपुर्वी 29 ऑक्टोबर रोजी  रणदिपसिंघ ईश्वरसिंघ सरदार यांनी गुन्हा क्र. 114 मध्ये मागितलेला जामीन अर्ज क्रमांक 653/2021 जिल्हा न्यायालय नांदेड यांनी फेटाळला होता आणि त्यानंतर एका आठवड्यात रणदिनसिंघ सरदारला आपली चुक झाल्याची उपरती आली आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *