नांदेड(प्रतिनिधी)-वसंतनगर भागातून एक आणि उस्मानानगर रस्त्यावरील बिजली हनुमान मंदिर येथून एक असे दोन मोबाईल बळजबरीने चोरून नेण्यात आले आहेत. रजानगर इतवारा भागात एक घर फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला आहे. शहरातील जुना मोंढा, तथागतनगर येथून दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. आणि किनवट येथील गोकुंदा भागात दोन दुचाकी अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे.
मारोती साहेबराव गाडगे हे व्यक्ती दि.3 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 वाजता रुपा गेस्ट हॉऊसजवळून पायी जात असतांना एका अनोळखी माणसाने त्यांच्या हातातील मोबाईल बळजबरीने चोरून नेला आहे. या मोबाईलची किंमत 16 हजार रुपये आहे. शिवाजीनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सोनकांबळे अधिक तपास करीत आहेत.
सुरज गोविंदराव बारादे हे 4 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या दिवशी बिजली हनुमान मंदिर, उस्माननगर रोड येथे दर्शन करून पायी जात असताना चार जण आले आणि त्यांनी खंजीरचा धाक दाखवून त्यांचा 15 हजार रूपये किंमतीचा मोबाईल लुटून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्ष केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
शुभम किशन परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रजानगर भागात असलेले त्यांचे घर दि. 3 नोव्हेंबरच्या रात्री 8 ते 4 नोव्हेंबर पहाटे 2.30 वाजेदरम्यान कोणीतरी चोरट्यांनी फोडले. त्यातून गॅस सिलेंडर, मोबाईल असा ऐवज चोरून नेला आहे. इतवारा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार रमेश गोरे अधिक तपास करीत आहेत.
शिवानंद नारायण बच्चेवार यांची 50 हजार रूपये किंमतीची दुचाकी गाडी क्र. एम.एच. 26 ए.एल. 3976 ही 29 ऑक्टोबरच्या सायंकाळी 15 मिनीटांच्या काळात चोरीला गेली. हैदरबागअली सजादअली कादरी यांची गाडी त्यांचे घर तथागतनगर येथून 1-2 नोव्हेंबरच्या रात्री चोरीला गेली. दिनेश माणिकराव कुमरे यांच्या तक्रारीनुसार 4 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर 1.45 वाजता त्यांचे वडील एम.एच. 26 ए.डब्ल्यू. 9199 वर बसून जात असताना ट्रक क्र. एम.एन. 22 एन. 1913 ने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर त्यांच्या वडीलांचा मृत्यू झाला आहे. किनवट पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक घुगे करीत आहे
