नांदेड

एकापेक्षा एक सरस भावगितांनी रंगली दिवाळी पहाट

नांदेड (प्रतिनिधी)-जिल्हा प्रशासन, महापालिका, गुरुव्दारा बोर्ड  आणि नागरीक सांस्कृतिक समितीच्या वतीने दिवाळी पहाटचा कार्यक्रम आज उत्तरोत्तर रंगत गेला. डॉ.नंदकुमार मुलमुले यांच्या संकल्पनेतून स्वरगंगेच्या काठावरती या  साकार झालेल्या कार्यक्रमात प्रख्यात संजय जोशी आणि वर्षा जोशी यांनी एकापेक्षा एक सरस भावगिते गावून रसिक, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
आज सकाळी सहा वाजता तीन दिवसीय दिवाळी पहाटचे उद्घाटन आमदार अमर राजूरकर, माजीमंत्री डी.पी.सावंत, जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर, पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, आयुक्त सुनील लहाने, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे आणि समितीचे प्रमुख शंतनू डोईफोडे आदींच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
निवेदन करताना डॉ.नंदकुमार मुलमुले यांनी कोरोनाच्या काळात प्रशासन, जनता व व्यवस्थापन यांची जी घालमेल झाली त्यातून सर्वसामान्य माणूस घाबरुन गेला, मात्र एका वर्षात या कोरोनावर लस आली आणि त्यानंतर समाधानाचे वातावरण निर्माण झाले. मात्र विषाणू कधीच नष्ट होत नाही. त्यामुळे येणाNया काळात सावधगिरी बाळगू असे सुरुवातीला सांगत त्यांनी कोरोनाच्या काळात प्रशासनाने केलेल्या कार्याचे कौतूक केले. आपल्या वेगवेगळ्या गाण्यांच्या निवेदनातून त्यांनी गोदाकाठ बंदाघाट आणि दिवाळी पहाट हे नांदेडच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतिक आहे, असा एकत्रित योग फार कमी ठिकाणी मिळतो, अशा भावना व्यक्त केल्या. गेल्यावर्षी दिवाळी पहाटचे १६ वे वर्ष होते. म्हणूनच म्हणतातना सोळावे वरीस धोक्याचे, तसेच झाले आणि गतवर्षीचा दिवाळी पहाट होवू शकला नाही. यावर्षी तो होत आहे याचा सर्वांनाच आनंद आहे.
होई मन सुध्द तुझ ही मराठी मालिका एबीपी माझावर सुरु आहे. त्याचे लेखक नांदेडचे डॉ.नंदकुमार मुलमुले आहेत, असा उल्लेख सुरुवातीलाच उद्घाटकीय कार्यक्रमात पत्रकार विजय जोशींनी केला. त्याबद्दल डॉ.मुलमुले यांनी या मालिकेचे शिर्षकच व त्यातील वेगवेगळ्या भागातील कथानक बरेच काही सांगून जाते. या मालिकेला रसिकांनी उत्स्पूâर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात प्रख्यात गायक संजय जोशी यांनी एकापेक्षा एक दर्जेदार गिते गावून आजच्या दिवाळी पहाटमध्ये खNयाअर्थाने रंगत आणली. औरंगाबादच्या वर्षा जोशी यांनी त्याच ताकदीने सादर केलेली गिते रसिकांना भावून गेली. संजय जोशी यांनी पूर्वेच्या देवा तुझे, तिन्ही लोक आनंदाने, माझे जीवन गाणे, तोच चंद्रमा नभात, ऋणानुबंधाच्या, निघालो घेवून दत्ताची पालखी, वैâवल्याच्या चांदण्याला ही गिते सादर केली. तर वर्षा जोशी यांनी Nहदयी प्रित जागते, स्वप्नात रंगले मी, असेल कोठे रुतला काटा आदी गिते सादर केली. तर संजय जोशी व वर्षा जोशी यांनी शुक्रतारा, धुंदी कळ्याना स्वप्नात रंगले मी ही गिते सादर केली. या कार्यक्रमाला संगीतसाथ जगदीश देशमुख, भार्गव देशमुख, स्वरुप देशपांडे, स्वरेश देशपांडे, शेख नईम यांनी केली. उत्तरोत्तर हा कार्यक्रम रंगत गेला. दिवाळी पहाट सुरु झाल्याने नांदेडच्या रसिकांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. गुलाबी थंडीत मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला गर्दी झाली.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.