नांदेड

स्वातंत्र्य सैनानी साहेबराव बारडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण ५ नोव्हेंबर रोजी   -ओमप्रकाश पोकर्णा 

नांदेड(प्रतिनिधी)-मराठवाडा मुक्ती संग्रामातील जेष्ठ सेनानी कै.साहेबराव बारडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कॉग्रेस नेते ओमप्रकाश पोकर्णा यांनी दिली.
   राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अवारामध्ये दि.५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता हा अनावरण सोहळा पार पडणार आहे अशी माहिती नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक तथा काँग्रेस नेते ओमप्रकाश पोकर्णा यांनी पत्रकार परिषदे दिली. 
                     नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी कै.साहेबराव देशमुख बारडकर यांच्या अर्धाकृती पुतळा अनावरण सोहळ्याबद्दल आज दि.३ रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी पाटील पुयड, सचिव वामनराव पवार, संजय लोणे, दत्ता पाटील पांगरीकर, दिपक पाटील, आनंद पाटील क्षिरसागर, बिसेन यादव यावेळी आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना पोकर्णा म्हणाले की,  कै.साहेबराव देशमुख बारडकर यांनी कृषी उत्पन्न बाजार सभापतीचे सभापती पद 38 वर्ष सांभाळले हे काम काज पाहतांना त्यांनी व्यापारी व शेतकरी यांच्या हितासाठी विविध धोरणात्मक निर्णय घेतले. त्यांच्या कार्याची दखल घेवून नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती पुतळा बसविण्यासाठी प्रयत्नशिल होती. मागील दोन वर्षापासून कै. बारडकरांचा पुतळा बसविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतू कोरोनामुळे हा कार्यक्रम लांबत गेला. या पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमाला खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम, आ.अमरनाथ राजूरकर, आ.बालाजी कल्याणकर, आ.मोहनअण्णा हंबर्डे,ओमप्रकाश पोकर्णा, महापौर सौ.जयश्री पावडे, जि.प.अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर, राष्ट्रवादी कॉंगे्रसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनिल कदम, चेअरमन गणपतराव तिडके, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद बोंढारकर, उमेश मुंढे, जि.प.सदस्य साहेबराव धनगे, कॉंगे्रस तालुकाध्यक्ष निलेश पावडे, जिल्हा उपनिबंधक मुकेश बाराहते,डॉ.शुभांगी गौंड यांच्यासह   अनेक जण उपस्थित राहणार आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.  
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.