नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेडमध्ये श्री गुरु गोविंदसिंघजी यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या नगरीत आज तखत स्नान सोहळा मोट्या उत्साहात पार पडला.
दरवर्षी दिवाळीच्या आदल्या दिवशी हा सोहळा साजरा होत असतो.सकाळी जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी यांनी प्रार्थना (अरदास) करून या सोहळ्याची सुरुवात केली.शहरातील हजारोच्या संख्येने भाविक आपल्या घरातील भांडे घेऊन गोदावरी काठी पोहचले.लहान बालके,बालिका,पुरुष,महिला आणि जेष्ठ नागरिक यात सहभागी झाले होते.सर्वानी गोदावरी नदी पात्रातून आप आपल्या भांड्यात आणलेल्या पाण्याने सचखंड श्री हजुर साहिबजीना स्नान केले.त्यानंतर पुन्हा प्रार्थना झाली आणि प्रसाद वितरण करण्यात आले.
नांदेड(प्रतिनिधी)-पत्रकारांकडे कोणत्याही प्रकारची माहिती आल्यानंतर त्याची शहा-निशा करून ती बातमी प्रकाशीत करावी अशी अपेक्षा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी यांनी व्यक्त केली. आज 6 जानेवारी पत्रकार दिन निमित्ताने आणि मराठीतील आद्य पत्रकार बाळाशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी महानगरपालिकेच्यावतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त डॉ.बाबासाहेब मनोहरे, सभागृह नेता […]
नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज 21 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तसेच 21 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. वैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये कॉंग्रेसचे जितेश रावसाहेब अंतापुरकर, भाजपाचे सुभाष साबने, वंचित बहुजन आघाडीचे उत्तम रामाराव इंगोले, जनता सेक्युलर पक्षाचे विवेक केरूरकर, बहुजन भारत पार्टीचे परमेश्वर वाघमारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डी.डी.वाघमारे, आंबेडकर नॅशनल पार्टीचे प्रल्हाद हाटकर, अपक्ष […]
नांदेड (प्रतिनिधी)-दक्षिण नांदेडमध्ये भव्य बांधण्यात आलेल्या महेश आवाज योजनेच्या लोकापर्ण सोहळ्यात स्थानिक आमदारांना निमंत्रीत न केल्याने समर्थकांत नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे. नांदेड शहरातील कौठा परिसरात महेश आवास योजनेअंतर्गत भव्य निवासी पार्क बांधण्यात आले आहे. बियाणी डेव्हल्पर्सचे संचालक संजय बियाणी यांनी नांदेडच्या वैभवात या पार्कमुळे आणखी भर टाकली आहे. सदरील पार्कचा लोकापर्ण सोळाही त्यांच्या […]