क्राईम

पाच चोऱ्या आणि एक फसवणूक; 2 लाख 94 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर भागात मंदिरातून मोबाईल चारी झाली आहे. एकूण 3 मोबाईल चोरीला गेले आहेत. सोबतच शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन, देगलूर येथून एक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. बिलोली शहरात एका वृध्द महिलेला फसवून ठग सेनाने तिच्या अंगावरील 7 ग्रॅमचे सोन्याचे दागिणे काढून घेतले आहेत.
रमेश किशनलाल साबू हे 1  नोव्हेंबर रोजी मंदिरात गेले असतांना त्यांच्या तीन मोबाईल, 87 हजार रुपये किंमतीचे हा प्रकार पटेल कॉलनीमध्ये घडला. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार घुगे हे करीत आहेत. राहुल राधेशाम क्षिरसागर हे मंदिरात गेले असतांना त्यांच्या घरातून रोख रक्कम 8 हजार आणि 18 हजार 500  रुपयांचा मोबाईल असा 26 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याही गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार घुगे यांच्याकडे आहे.
वजिराबाद भागातून फटका मार्केट हिंगोली गेट येथे फटाके खरेदी करण्यासाठी गेलेल्या रोहित नंदकुमार डंख वालूरकर यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.बी.4005 ही 60 हजार रुपये किंमतीची गाडी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी चोरीला गेली आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार डोईवाड अधिक तपास करीत आहेत. तसेच मोहम्मद नईम अब्दुल जलील यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.के. 0420 ही 60 हजार रुपये किंमतीची गाडी 6 ऑक्टोबर रोजी भालेराव हॉस्पीटलजवळून चोरीला गेली आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार खानसोळे अधिक तपास करीत आहेत. देगलूर येथील शहाजी नगर भागातील सुश्रुत हॉस्पीटलसमोरून 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी जय गंगाधर ढवळे या डॉक्टरांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 डब्ल्यू 3665 चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 25 हजार रुपये आहे.देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार कांबळे अधिक तपास करीत आहेत.
बिलोली येथील कुरेशी गल्ली भागात गंगुबाई संभाजी होरके (65) या आठवडी बाजार करण्यासाठी गेल्या असतांना दि.31 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता त्यांना एक भामटा भेटला आणि त्यांना तुझे 60 वर्ष वयाचे पैशाचे काम करून देतो मी बॅंक मॅनेजर आहे असे सांगून त्यांना भुलथापा दिल्या आणि त्यांना थोडे बाजूला नेऊन त्यांच्या अंगावरील 7 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या काड्या 35 हजार रुपये किंमतीच्या काढून घेतल्या. बिलोली पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून ठकसेनाचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक अनिल सनगले अधिक तपास करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.