नांदेड

नांदेड शहरातून बाहेर जाणाऱ्या 10 रस्त्यावर वेगमर्यादा निश्चित; आता दंडाची रक्कम वाढली ; रस्त्यावर फलक नाहीत

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या दहा रस्त्यांवर विहित वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगात गाडी चालवली तर आता दंडाची रक्कम वाढली आहे. वाहन धारकांनी या बाबत दक्षता घेण्याची गरज आहे. महामार्ग बनविणाऱ्यांनी सुध्दा त्या रस्त्यावर किती गती वेगाने गाडी चालवता येते याचे दर्शक फलक लावण्याची गरज आहे.
राष्ट्रीय महामार्गांचा वापर सुरू झाल्यानंतर राज्यात जवळपास सर्वच मार्गांवर वाहनांचा वेग सुनिश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार वाहन चालवणे आवश्यक आहे. नाही तर महामार्ग पथकाची गाडी दुरूनच आपल्या गाडीचा वेग मोजते आणि आपो-आपच त्या गाडीवर दंड लावला जातो. सर्व बाबी ऑनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे दंडाची रक्कम आणि त्याचा संदेश गाडीच्या क्रमांकानुसार नोंदणी केलेल्या मोबाईलवर येतो. यातही गफलती होतात. त्यानुसार वाहन धारकांना त्यासाठी आपल्या आक्षेप नोंदवावा लागतो. आक्षेप सुध्दा ऑनलाईन नोंदवता येतो.
नव्याने दि.1 नोव्हेंबरपासून दंडाच्या रक्कमेत वाढ झाली आहे. पुर्वीचा दंड आणि नवीन दंड पुढील प्रमाणे आहे. नवीन दंड कंसात लिहिला आहे. वेगमर्यादेचा भंग करणाऱ्या दुचाकी गाड्या दंड-1000(1000), चार चाकी वाहनाने वेगमर्यादा तोडली तर दंड-1000 (2000) इतर वाहनांनी वेगमर्यादा मोडली तर दंड-1000(4000), विना हेल्मेट दंड-500(1000), बिना सिट बेल्ट दंड-200(1000), बिना परवाना दंड -2000(10000) असा झाला आहे.
नांदेड शहरातून बाहेर जाणाऱ्या दहा रस्त्यांची वेगमर्यादा पुढील प्रमाणे आहे.नांदेड ते  नरसी रस्ता चार चाकी गाड्या 95 किलो मिटर प्रति तास, बस-84 किलो मिटर प्रति तास, टॅम्पो ट्रक-84 किलो मिटर प्रति तास, दुचाकी-70 किलो मिटर प्रति तास, तीन चाकी-63 किलो मिटर प्रति तास, नांदेड-हदगाव रस्ता  चार चाकी गाड्या 95 किलो मिटर प्रति तास, बस-84 किलो मिटर प्रति तास, टॅम्पो ट्रक-84 किलो मिटर प्रति तास, दुचाकी-70 किलो मिटर प्रति तास, तीन चाकी-63 किलो मिटर प्रति तास, नांदेड-लोहा रस्ता  चार चाकी गाड्या 74 किलो मिटर प्रति तास, बस-63 किलो मिटर प्रति तास, टॅम्पो ट्रक-63 किलो मिटर प्रति तास, दुचाकी-63 किलो मिटर प्रति तास, तीन चाकी-53 किलो मिटर प्रति तास, नांदेड ते पुर्णा रस्ता चार चाकी गाड्या 74 किलो मिटर प्रति तास, बस-63 किलो मिटर प्रति तास, टॅम्पो ट्रक-63 किलो मिटर प्रति तास, दुचाकी-63 किलो मिटर प्रति तास, तीन चाकी-53 किलो मिटर प्रति तास, नांदेड ते मालेगाव रस्ता चार चाकी गाड्या 74 किलो मिटर प्रति तास, बस-63 किलो मिटर प्रति तास, टॅम्पो ट्रक-63 किलो मिटर प्रति तास, दुचाकी-63 किलो मिटर प्रति तास, तीन चाकी-53 किलो मिटर प्रति तास, नांदेड ते मुदखेड रस्ता चार चाकी गाड्या 74 किलो मिटर प्रति तास, बस-63 किलो मिटर प्रति तास, टॅम्पो ट्रक-63 किलो मिटर प्रति तास, दुचाकी-63 किलो मिटर प्रति तास, तीन चाकी-53 किलो मिटर प्रति तास, भोकर ते किनवट रस्ता चार चाकी गाड्या 74 किलो मिटर प्रति तास, बस-63 किलो मिटर प्रति तास, टॅम्पो ट्रक-63 किलो मिटर प्रति तास, दुचाकी-63 किलो मिटर प्रति तास, तीन चाकी-53 किलो मिटर प्रति तास, नरसी ते बिलोली रस्ता चार चाकी गाड्या 74 किलो मिटर प्रति तास, बस-63 किलो मिटर प्रति तास, टॅम्पो ट्रक-63 किलो मिटर प्रति तास, दुचाकी-63 किलो मिटर प्रति तास, तीन चाकी-53 किलो मिटर प्रति तास, नरसी ते देगलूर रस्ता चार चाकी गाड्या 74 किलो मिटर प्रति तास, बस-63 किलो मिटर प्रति तास, टॅम्पो ट्रक-63 किलो मिटर प्रति तास, दुचाकी-63 किलो मिटर प्रति तास, तीन चाकी-53 किलो मिटर प्रति तास, नरसी ते मुखेड रस्ता चार चाकी गाड्या 74 किलो मिटर प्रति तास, बस-63 किलो मिटर प्रति तास, टॅम्पो ट्रक-63 किलो मिटर प्रति तास, दुचाकी-63 किलो मिटर प्रति तास, तीन चाकी-53 किलो मिटर प्रति तास असे आहेत.
वेग मर्यादा निश्चित करून त्यावर दंडाची रक्कम वाढविण्यात आली. पण महामार्गावर आज तरी कोठेच त्या रस्त्यावर कोणत्या गतीने वाहन चालवावे हे दाखवणारे फलक कोठेच दिसत नाही. जोपर्यंत जनतेला माहित होणार नाही तो पर्यंत त्यांच्यावर दंडाची आकारणी तसा अन्याय आहे. वास्तव न्युज लाईव्हच्या वतीने ही जागरूकता आणण्यासाठीच या बातमीला प्रसिध्दी दिली आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *