नांदेड(प्रतिनिधी)-दि.31 ऑक्टोबर रोजी आपल्या शासकीय सेवेतील विहित सेवाकाळ पुर्ण करणाऱ्या तीन पोलीस अंमलदारांना पोलीस विभागाने गृहपोलीस उपअधिक्षक विकास तोटावार यांच्यावतीने सन्मान करून त्यांना निरोप दिला.
शासकीय सेवेतील आपले विहित वयोमर्यादा पुर्ण करणाऱ्या पोलीस अंमलदार धोंडीबा नागोबा मोरे खैरकेकर(पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण), चंद्रकांत विठ्ठल शिंदे (पोलीस ठाणे मनाठा) आणि नारायण भुमाजी तोटेवाड (पोलीस मुख्यालय) या तीन पोलीस अंमलदारांनी आपला विहित कार्यकाळ 31 ऑक्टोबर रोजी पुर्ण केला.
पोलीस अधिक्षक कार्यालयातील सभागृहात पोलीस विभागाच्यावतीने या तिघांना सहकुटूंब सन्मानीत करून त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा देतांना विकास तोटावार म्हणाले. तुमच्या अडचणींसाठी आम्ही सदैव तयार आहोत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक पोलीस निरिक्षिक शिवाजी लष्करे यांनी केले. पोलीस अंमलदार राखी कसबे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते.
