नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र खंडेलवाल समाजाच्या प्रदेश अध्यक्षपदी लातूर येथील जयनारायण रुथळा यांची बिनविरोध निवड झाली.
महाराष्ट्र प्रदेश खांण्डल (खंडेलवाल) समितीची आज लातूर येथे बैठक होती. या बैठकीत माजी अध्यक्ष बंकटलाल रिनवा आणि राज्यातील 46 शाखा सभांचे अध्यक्ष आणि प्रदेश संघटनचे आजीवन सदस्य उपस्थित होते. समाजाच्या भल्यासाठी विचार करून निवडणुक न घेता ही निवडणुक बिनविरोध व्हावी असे आवाहन करण्यात आले होते. एकूण 7 जणांनी अध्यक्ष पदासाठी अर्ज भरले होते. अर्ज भरल्यानंतर सर्वांनी एकमत व्हावे म्हणून उमेदवारांना वेगवेगळ्या चर्चा केल्या. त्यात राजकीय खेळी सुध्दा झाल्या आणि अखेर अध्यक्ष पदातील सात पैकी सहा उमेदवारांनी आपली नावे परत घेतली. नाव परत घेणारे सहावे उमेदवार ईचलकरंजी येथील पिपळवा यांनी आपले नाव परत घेतांना अध्यक्ष पदासाठी सर्वानुमते जयनारायण रुथळा यांची निवड जाहीर केली. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष जयनारायण रुथळा यांनी कार्याध्यक्षपदावर ईचलकरंजी येथील संतोष पिपळवा यांची निवड जाहिर केली. त्यानंतर औपचारीक रित्या निर्वाचन अधिकारी रामनिवास पिपळवा यांनी अध्यक्ष निवडीची घोषणा केली. त्यानंतर माजी अध्यक्ष बंकटलाल रिणवा यांनी अध्यक्षपदाच्या गोपनियतेची शपथ जयनारायण रुथळा यांना दिली. त्यानंतर उपस्थितांनी नवनिर्वाचित अध्यक्ष जयनाराय रुथळा आणि कार्याध्यक्ष संतोष पिपळवा यांना शुभकामना दिल्या. खांण्डल महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष पदाचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो माजी अध्यक्ष बंकटलाल रिणवा यांनी पदग्रहण समारंभ करून आपल्या पदाचा कार्यभार नुतन अध्यक्ष जयनारायण रुथळा यांच्याकडे दिला. अध्यक्ष पदातील एक उमेदवार नाशिक येथील रामअवतार रिणवा यांनी आपल्या नावाची घोषणा सचिव पदावर करावी असा हेका लावला होता. पण राजकीय खेळीमध्ये आज तरी त्यांना सचिव पद देण्यात आले नाही. राजकारणात असे घडत असते असे सांगणारी मंडळी नंतर रामअवतार रिणवा यांना मिश्कील हास्य देत होती.
राज्यभरातून या बैठकीसाठी आलेल्या मान्यवरांमध्ये बनवारीलाल माटोलीया, जगदीश निढाणीया, गोपाल पिपळवा, बच्छराज चोटीया, कमलकिशोर सेवदा, अशोककुमार शर्मा, अशोक चोटीया, सुरेश नवहाल, ईश्र्वर सेवदा, रामनिवास बन्सा, हनुमानदास चोटीया, प्रशांत शर्मा, सुशील काछवाल, नंदकिशोर पिपळवा, नंदकिशोर झुनझुनोद्दीया, लालू खंडेलवाल, जय शर्मा, भिख्खुलाल खंडेलवाल, गौरीशंकर शर्मा, अनिल पिपळवा, कैलास पिपळवा, संजय झिनझिनोद्दीया, जुगलकिशोर माटोलीया, द्वारकादास माटोलिया, गोपिकिशन पिपळवा, ऍड. दिपक बढाढरा, रामप्रसाद चोटीया, रामप्रसाद खंडेलवाल, राधेशाम डिढवाणीया, प्रल्हाद बन्सा, सत्यनारायण बन्सा, ऍड. संजय खंडेलवाल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
काम पारदर्शक व्हावे-समाजाची अपेक्षा
नवनिर्वाचित अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांनी महाराष्ट्रातील सर्व खांण्डल (खंडेलवाल) समाजाच्या व्यक्तींना पारदर्शपणे आपला कारभार दाखवत राहावे. समाजातील सर्वात छोट्या व्यक्तीचे म्हणणे काय आहे त्यापासून समाजाला काय देता येईल यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा खंडेलवाल समाजाची आहे. सोबतच समाजातील अनेक निराश्रीत, गरजवंत विद्यार्थी यांना काय सुविधा देता येतील यावर भर द्यावा. कोणताही पदाधिकारी हा माझा विरोधक आहे असे न वागता प्रत्येकासाठी समाज बंधू ही भावना ठेवून काम करेल अशी अपेक्षा आहे. आज तांत्रीक युग आहे. या युगात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुध्दा छोट्या-छोट्या प्रयत्नातून मोठी-मोठी कामे करता येतात याकडे लक्ष देवून समाजाच्या हितासाठी जे काय शक्य होईल ते सर्व काम करावे अशी अपेक्षा समाजाने व्यक्त केली आहे.