नांदेड(प्रतिनिधी)-बिंदूराज गणेश तुंगेवाड या वैद्यकीय प्रतिनिधीच्या खात्यातून 94 हजार 467 रुपये वळवून फसवणूकीचा प्रकार विमानतळ पोलीसांनी दाखल केला आहे.
बिंदुराज तुंगेवाड हे 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता नंदीग्राम सोसायटीकडे जात असतांना त्यांच्या मोबाईलवर कॉल आला आणि मी एसबीआय बॅंकेच्या क्रेडीट कार्ड कंस्टमरकेअरमधून बोलतो आहे असे सांगून त्यांच्या के्रडीट कार्डचा ओटीपी मागून त्यांच्या खात्यातून 94 हजार 467 रुपये वळती करण्यात आले आहेत.
2 ऑक्टोबरला घडलेला हा गुन्हा विमानतळ पोलीसांनी 30 ऑक्टोबर रोजी दाखल केला आहे. पोलीस विभाग, प्रसारमाध्यमे आणि बॅंका तसेच आरबीआय जनतेला आवाहन करत असते की, कोणत्याही कॉलवर आपला ओटीपी सांगून नका तरी पण शिक्षीत असलेले व्यक्ती सुध्दा या फसवणूकीचा बळी पडतात आणि आपले पैसे गमावतात.
