शहरातील तपासीक अंमलदार यांच्या उठा ठेवीला कंटाळले
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दल अगोदरच एका सुर्याजी पिसाळामुळे त्रासले असतांना एक नवीनच रामोशी उभा राहिला आहे. रामोशी जमातीच्या ईतिहासाला काळीमा फासत पोलीस दलात असलेला हा रामोशी आपल्या डिव्हीजनमधील प्रत्येक तपासीक अंमलदाराला सळोकी पळो करून साडत आहे. यावर लक्ष कोण देणार? कारण म्हणतो सुध्दा माझ्यावर नियंत्रण फक्त शासनाचे आहे. आपल्या जीवनातील अनेक बाबींना व्हाईटनर लावून पांढरे करून मी स्वच्छ आहे असे दाखविण्याचा हा प्रयत्न सर्व सामान्य माणसांसाठी मात्र मारक आहे.
मागील वर्षी नांदेड जिल्ह्यात एका सुर्याजी पिसाळाचे आगमन झाले. त्याने तर सिंहासनच बळकावण्याची शपथ घेतली आणि तसे खलबतपण सुरू केले. पण नशिब आणि परमेश्र्वर सिंहासनाच्या हक्कात होते म्हणून सिंहासनाचे कांही एक वाकडे झाले नाही. तरी पण सुर्याजी पिसाळ आपल्या परीने प्रयत्न करत राहतात. आपले कांही तुटपुंजे सेवक सोबत घेवून जिल्ह्यात छळवणूक सुरूच आहे. पण असे म्हणतात ना आपल्या मनातील पाप आपल्यालाच खात राहते. असेच कांही तरी घडत आहे. त्यामुळे आजही सुर्याजी पिसाळाचा कट यशस्वी होण्याची चिन्हे दिसली नाहीत. सुर्याजी पिसाळला नांदेडला आणाणाऱ्यांना सुध्दा आता याची जाणिव झाली आहे. त्यामुळे त्यांनी एक माणूस बदलून दुसरा आपल्या साथीला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण मुळ अधिकार ज्या व्यक्तीकडे आहेत. ते सुध्दा कांही मुर्ख नाहीत त्यांना तर सर्वच कळते.
हा एक भाग कसा तरी सांभाळत सिंहासनाने आपले काम सुरू ठेवले होते. अनेक अडचणींना तोंड देत अत्यंत दृढ निश्चयी सिंहासन डगमगले नाही आणि ज्यांनी प्रयत्न केला त्यांचीच वेळ डगमगण्याची आली. प्रसिध्द शायर राहत इंदोरी म्हणतात, “जो दुनिया मे सुनाई दे उसे खामोशी कहते है, जो आँखो मे दिखाई दे उसे तुफान कहते है..’ या शब्दांना खरे ठरवत सिंहासन आपले काम योग्यरितीने करत असतांना एक नवीनच रामोशी आला.
नांदेड शहरात चार पोलीस ठाण्याचा कारभार यांच्या हातात आहे. मुळात हातात कांहीच नाही माझ्या हातात सर्व कांही आहे असे दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. माझ्यावर कोणाचे नियंत्रण नाही माझ्यावर फक्त शासनाचे नियंत्रण आहे अशा अर्विभावात यांची वागणूक आहे. पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या प्रत्येक गुन्ह्याची फाईल मागवून त्यातील लोकांना आपल्या समोर बोलावून काय-काय उचापती होतात हे लिहितांना त्या सर्व सामान्य माणसांना झालेला त्रास आठवून अंगावर शहारा येतो. सदरक्षणाय खलनिग्रहनाय या ब्रिद वाक्याप्रमाणे पोलीस खात्याचे काम चालायला हवे तर याच्या उलटच या विभागात चालते. चार पोलीस ठाण्यांमध्ये काम करणाऱ्या ज्या-ज्या व्यक्तींची भेट या रामोशींशी झाली आहे. त्यांना आपल्या तोंडून शब्द बाहेर काढायला सुध्दा लाच वाटेल अशी त्यांची परिस्थिती आहे.
भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्याही तपासीक अंमलदाराच्या कामात कधीच हस्तक्षेप करत नाही पण हे रामोशी प्रत्येक गुन्ह्याच्या तपासात हस्तक्षेप करतात. त्यामुळे तपासीक अंमलदारांना काम करणे अवघड झाले आहे. काम करावे की त्यांना भेटावे हा प्रश्न तपासीक अंमलदारांना पडला आहे. भेटायला गेल्यावर तपासीक अंमलदारांना त्या कार्यालयात बसायला खुर्ची नाही म्हणून ते बाहेरच झाडाखाली आपले बस्तान घेवून उभे राहतात. तासन-तास वाट पाहिल्यानंतर कुठे तरी त्यांचा नंबर लागतो आणि जे त्यांना ऐकावे लागते त्या शब्दांना लिहुन आम्ही आमची पात्रता कमी करू इच्छीत नाही.
ब्रिटीशांच्या काळात रामोशी या गटाला गुन्हेगारंाची संज्ञा होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर रामोशीला अनुसूचीत जमातीमध्ये स्थान मिळाले. उमाजी नाईक सारखा आद्यक्रांतीकारक या जातीत जन्मला ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी 1857 च्या उठावा अगोदरच अनेक उठाव केले आणि 14 वर्ष इंग्रजांना पळता भोईथोडी केली. त्यावेळी रामोशांनी वापरलेली ताकत ही समाजाच्या हितासाठी होती. पण हा रामोशी समाजाचा घात करण्यासाठी आपल्या खुर्चीचा गैर वापर करत आहे. नरविर राजे उमाजी नाईक यांचा ईतिहास वाचायला हवा. जरी इंग्रजांनी त्यांना गुन्हेगार या सदरात लेखून ठेवले होते. त्यांचा ईतिहास हा आजही आपली छाती फुगवणारा आहे. आपल्या शस्त्राच्या आणि ताकतीच्या जोरावर राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजांना दिलेला धडा शिकण्याऐवजी रामोशींच्या ताकतीला आपल्या कायदेशीर भाषेत वळविण्याचा हा दुर्देवी प्रकार नांदेड शहरात घडत आहे.
