

नांदेड,(प्रतिनिधी)- डबल इंजिन मांडूळ जातीचा साप दोन जणांनी इतवारा पोलिसांना आणून दिल्यांनतर पोलिसांनी त्या सापाची रवानगी वन विभागाकडे केली आहे.
काल दिनांक २९ ऑक्टोबर रोजी मोहंमद अजिमोद्दीन मोहंमद हाफिजोद्दीन आणि सर्प मित्र गणेश भोसले हे दोघे बाफना ते देगलूर नाका कडे जात असतांना कापूस संशोधन केंद्रा जवळ त्यांना एक मांडूळ जातीचा साप दिसला.मांडूळ जातीचा साप डबल इंजिन म्हणून पण ओळखला जातो. या सापाची किंमत आहे.या सापाच्या माध्यमाने आजही अनेक अंधश्रद्धा प्रचलित आहेत.अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असतांना सुद्धा अनेक अंधश्रद्धेचे प्रकार घडत असतात.
साप पाहिल्यावर त्या दोघांनाही तो अडीच किलो वजनाचा मांडूळ जातीचा साप पोलीस चौकी देगलूर नाका येथे आणून दिला.इतवारा उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे,प्रभारी पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांना सापाची माहिती देऊन त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार तो मांडूळ जातीचा साप वन विभागाचे अधिकारी झाडे यांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केला आहे.
इतवारा पोलिसांनी प्राप्त झालेल्या माहितीला जलद प्रतिसाद देत.एका सापाचे प्राण वाचवले आहेत.नाहीतर नक्कीच त्याचा काहीतरी दुरुपयोग झाला असता आणि मांडुळाचे प्राण गेले असते.मोहंमद अजिमोद्दीन मोहंमद हाफिजोद्दीन आणि सर्प मित्र गणेश भोसले यांनी सुद्धा आपले कर्तव्य बजावत साप पोलिसांकडे आणला आणि सर्व काही व्यवस्थित पार पडले.