नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील नियमबाह्यपणे लिपीक आणि बिल कलेक्टर झालेल्या 9 जणांना पुन्हा सफाई कामगार या पदावर पुर्ननियुक्ती देण्यात आली आहे. बेकायदेशीररित्या या लोकांना सफाई कामगार ते लिपीक करणाऱ्या संबंधीत व्यक्तींवर मात्र कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.दिवाळीपुर्वी मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांनी ही कार्यवाही केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय घडू शकते याचा कांही कधी नेम नाही. अनेक बेकायदेशीर कामे सर्वसाधारण सभेत मान्यता दिले जाते त्याचे ठराव मंजुर होता. आणि आपल्या मर्जीची कामे पदाधिकारी प्रशासनिक अधिकाऱ्यांकडून करू घेतात. नांदेड मनपाच नव्हे तर राज्यभरातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असे बेकायदेशीर प्रकार घडत असतात.
29 ऑक्टोबर रोजी मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेतील 11 लिपीक आणि एक बिल कलेक्टर यांना पुन्हा सफाई कामगार पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यासाठी अनेक संदर्भ जोडण्यात आले आहेत. ज्यामध्ये उच्च न्यायालय औरंगाबाद, औद्योगिक न्यायालय आणि शासनाचा अभिप्राय असे संदर्भ जोडण्यात आले आहेत. बिल कलेक्टर पदावर कार्यरत असलेले भगवान गंगाराम जोंधळे, लिपीक पदावर कार्यरत असलेले राजू कचरु करडे, अर्चना दत्ता जोंधळे, नितीन झरीबा कांबळे, रेखा पंडूलिकराव गजभारे, साहेबराव विठ्ठल जोंधळे, किशन अर्जुन वाघमारे, राहुल यादव कांबळे आणि महेश चंद्रमोहन जोंधळे या सर्व 12 जणांना सफाई कामगार पदाच्या नवीन वेतन श्रेणीमध्ये त्यांचे नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.
ज्या मनपा अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररित्या या लोकांना पदोन्नती दिली त्यांच्यावर मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. कोणीही काहीही मागणी करेल तर त्यासाठी कायदा आणि नियमांचा आधार आवश्यक असतो. तेंव्हा ज्यांनी अशा पदोन्नत्यांचे आदेश काढले होते. त्यांच्यावर सुध्दा कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
