नांदेड(प्रतिनिधी)- बोगस माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्यचे बोगस अध्यक्ष शेख जाकीर शेख सगीरने एका नियमित फौजदारी खटल्यात साक्ष देतांना यास समितीची नोंद नसल्याचे न्यायालयासमक्ष मान्य केले आहे.
शिवाजीनगर पोलीसांनी दाखल केलेल्या एका नियमित फौजदारी खटल्यात साक्षीदार क्रमांक 4 म्हणून आपला जबाब न्यायालयासमक्ष नोंदवतांना शेख जाकीर शेख सगीरने आपला स्वत:चा बोगसपणा स्वत: न्यायालयासमक्ष मान्य केला. या संदर्भात 21 ऑक्टोबर 2021 रोजी नियमित फौजदारी खटला क्रमांक 260/2018 मध्ये साक्षीदार क्रमांक 4 म्हणून शेख जाकीर शेख सगीरने आपले साक्ष नोंदवली. झालेला घटना क्रमांक 13 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत घडला असे साक्षीत शेख जाकीरने म्हटले आहे. अर्धापूर येथून येवून चैतन्यनगर मार्गाने भाग्यनगर येथे पवार टी हॉऊसला नाष्टा करून कलेक्टर ऑफिसला जात असतांना मी घटना पाहिली असे लिहिले आहे. तेथे शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी डोंगरे आणि इतर एक आले आणि त्या दिवशीच्या आरोपीला घेवून गेले. पण जबाबात असे कोठेही नाही की, फिर्यादीचे काय झाले. त्याला कोण घेवून गेले याबद्दल काहीच सांगितले नाही ही सर्व माहिती शेख जाकीरने सर तपासणीमध्ये दिली.
या प्रकरणात उलट तपासणी ऍड. आय.सी.जोंधळे यांनी घेतली.शेख मुदीब शेख हुसेन हा माझ्या मामाचा मुलगा नाही असे सांगितले. 7 फेबु्रवारी 2018 रोजी मी माझा जबाब पोलीसांना दिला असे सांगितले. पोलीसांना दिलेल्या जबाबात तेथे आरोपी व फिर्यादी एकमेकांना शिवीगाळ करत होते. आरोपीने फिर्यादीची कॉलर धरली होती. फिर्यादीच्या हाताला आरोपीने चावा घेतला होता. या सर्व बाबी माझ्या जबाबात का नमुद नाहीत ह्याचे कारण मी सांगू शकत नाही असे शेख जाकीर शेख सगीरने सांगितले. सर तपासणीत पवार टी हॉऊसमध्ये नाष्टा केला असे सांगणारा शेख जाकीर उलट तपासणीमध्ये भाग्यनगर भागात पवार टी नावाचे कोणतेही चहाचे दुकान नाही हे मान्य करतो. सोबतच नांदेड शहरात गुरूजी नावाचे उद्यान नाही हे सुध्दा मान्य करतो. इतरांची छोटीशी चुक वायर करणाऱ्या शेख जाकीरला इतवारा येथे दाखल झालेला गुन्हा क्रमांक 169/2021 हा गुन्हा माहिती नसल्याचे सांगतो. वजिराबाद येथे दाखल झालेला 320/2021 हा गुन्हा दाखल आहे हे मान्य करतो. आरसीसी क्रमांक 34/2014 (अर्धापूर येथे घडलेल्या दंगलीचा गुन्हा) मध्ये मी आरोपी होतो हे मान्य आहे. माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्यचा मी संस्थापक अध्यक्ष आहे असे न्यायालयासमक्ष उलट तपसाणीमध्ये सांगितले. त्यावेळी न्यायालयाने प्रश्न विचारला माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संस्था नोंदणीकृत आहे का यावर शेख जाकीरने उत्तर दिले घटनेमध्ये आहे.
यानंतर ऍड. आय.सी.जोंधळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना शेख जाकीर शेख सगीर म्हणाला सदर संस्था अर्थात माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य माहिती सेवा समितीच्या घटनेमध्ये नोंदणीकृत आहे.(या जनहित माहिती सेवा समितीच्या घटनेमध्ये अशी कोणतीही नोंद नाही.) माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य याची वेगळी नोंद नाही हेही मान्य केले. मी पोलीस शिपाई गोडबोले यांना ओळखत नाही असे शेख जाकीरने न्यायालयात सांगितले. माहिती अधिकाराखाली मी माहिती मागतो व माहिती मिळाली नाही तर त्याअंतर्गत गुन्हा दालख करून ब्लॅकमेल करण्याची सवय आहे असा प्रश्न ऍड. आय.सी.जोंधळे यांनी विचारला असता हे म्हणणे खरे नाही असे जाकीरने सांगितले.
नियमित फौजदारी खटला क्रमांक 260/2018 मध्ये बोगस माहिती अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्यच्या बोगस अध्यक्षाने अशा नावाच्या संस्थेची नोंद नाही हे मान्य केले. तरीपण भारतातल्या प्रगल्भ लोकशाहीतील अत्यंत कर्तव्यदक्ष, कर्दनकाळ, पारदर्शक म्हणवून घेणारे प्रशासकीय अधिकारी आपले अशा पध्दतीचे शब्द वर्णन बातम्यामध्ये छापून घेतात तरी दंगलीच्या गुन्ह्यात आरोपी होतो असे मान्य करणाऱ्या बोगस समितीच्या बोगस अध्यक्षाला प्रतिसाद देतात यापेक्षा जगात सर्वात मोठी प्रगल्भ असलेल्या भारताच्या लोकशाहीचे दुसरे दुर्देव काय? आपल्या लेटर हेडवर आपल्या नावासमोर कंसात स्वत: बद्दल स्वत:च महाराष्ट्र भूषणपण लिहून ही बोगसगिरी काही सुर्याजी पिसाळांमुळे सुरू आहे.
