नांदेड(प्रतिनिधी)-सावकारी व्यवहार करण्याचा परवाना नसतांना सावकारी करणाऱ्या धर्माबाद येथील एकाविरुध्द सहाय्यक निबंधक सहकारी संस्था धर्माबाद येथील मुख्य लिपीकाने दिलेल्या तक्रारीनंतर सावकारी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था धर्माबाद येथील मुख्य लिपीक मुकेश त्रिंबकराव साळवेश्र्वर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आनंदनगर धर्माबाद येथील योगेश पांडूरंग चौधरी यांनी 1 सप्टेंबर 2021 ते 4 ऑक्टोबर 2021 दरम्यान सावकारी व्यवहार करण्याचा परवाना नसतांनाही सावकारी व्यवहार केल्याचे कागदपत्रावरून समोर आले आहे. धर्माबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 248/2021 महाराष्ट्र सावकारांचे नियमन अधिनियम 2014 तील कलम 39 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक माधव वाडेकर हे करीत आहेत.
