ताज्या बातम्या महाराष्ट्र

अशोकराव बापाचे काही गुण घ्या हो-ऍड. बाळासाहेब आंबेडकर

नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.शंकरराव चव्हाण हे उत्कृष्ठ आणि शानदार व्यक्तीमत्व होते. अशोक चव्हाणांनी आपल्या बापातील कांही गुण घ्यावेत अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.
देगलूर-बिलोली मतदार संघाच्या निवडणुकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ऍड.बाळासाहेब आंबेडकर दि.25 ऑक्टोबर रोजी देलूरला आले होते आणि निवडणुकीच्या संदर्भाने घेतलेल्या प्रचार सभेत आंबेडकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीच्या अंजलीताई आंबेडकर, अध्यक्षा रेखाताई ठाकूर, निलेश विश्र्वकर्मा, अशोक सोनवणे, मारोती सोनकांबळे, भगवान खंदारे, दिगंबर मोरे, शाम कांबळे यांची उपस्थिती होती.
देगलूर आणि बिलोली मतदार संघ मला नवीन नाही. असे सांगतांना ऍड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले 1986 मध्ये मी तुमच्याविरुध्द निवडणूक लढवली होती अशोकराव ती निवडणुक मी वाड्याच्या सांगण्यावरून लढवली होती. कारण काय हे सांगणार नाही, त्याचे कारण असे की, निवडणुक झाल्यानंतर मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची भेट झाली होती त्यावेळी त्यांनी मी राजगृहाला येतो असे मला सांगितले होते. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, तुम्ही मोठे व्यक्ती आहात मीच वर्षावर येतो. भेट झाली तेंव्हा शंकरराव चव्हाण म्हणाले होते. निवडणुक संपली आहे बाळासाहेब आता मागच कांही काढू नका. त्यावेळी मी त्यांना शब्द दिला होता आणि म्हणूनच मी 1986 मध्ये लढलेले निवडणुकीचे कारण सांगत नाही. डॉ.शंकरराव चव्हाण हे खुप उत्कृष्ट आणि शानदार व्यक्तीमत्व होते.अशोकराव तुम्ही आपल्या बापाचे कांही गुण घ्या अशी माझी आपल्याकडून अपेक्षा आहे असे ऍड. आंबेडकर म्हणाले.
वंचितच्या गाडीमध्ये पेट्रोल बीजेपी भरते हे आपण सांगता अशोकराव अशी चुक करू नका कारण आम्ही हा प्रश्न उच्च न्यायालयाला विचारणार आहोत. त्यावेळी उत्तर देतात-देता त्रेधातिरपीट उडेल. आदर्श प्रकरण तुम्ही मागे पाडले असले तरी एक मोर्चा उच्च न्यायालयावर जाईल आणि त्यातून ती दाबलेली आदर्श संचिका पुन्हावर येईल. तुम्ही, तुमची बायको, सासू हे सर्व जेलमध्ये जाताल. तुम्हीच नाही तर तुम्ही आपल्यासोबत सुशीलकुमार शिंदे यांनापण घेवून जाताल. त्यानंतर फक्त जेल आणि कोर्ट अशा वाऱ्या कराव्या लागतील. मी आज हेलीकॉप्टरने आलो आहे. त्याबद्दल कांही बोलू नका नाही तर माझे कार्यकर्ते आदर्श बाहेर काढतील.निवडणुक हे खुले मैदान आहे आणि आम्ही तर नागवेच आहोत आमच्याकडे हरण्यासारखे कांही नाही. तो विचार तुम्हाला करायचा आहे अशोकराव.
शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते आता दुर्देवाने राज्य सरकारच्या मंत्रीमंडळात सदस्य  आहेत तरी लेंडी प्रकल्पाचे काम का सुरू झाले नाही याचे उत्तर जनतेने विचारायला हवे. आजपर्यंत अनेक लोकांचा भुसंपादन मावेजा प्राप्त झाला नाही. त्यासाठी वंचित बहुजन आघाडी नक्कीच प्रयत्न करेल असे सांगितले. 1986 ते 2021 असे 35 वर्ष झाले आहेत. एवढा काळ एका प्रकल्पाला पुर्ण करण्यासाठी लागत असेल तर देगलूर-बिलोली मतदार संघात काय काम झाले याचा विचार मतदान करतांना जनतेने कराव असे ऍड. आंबेडकर म्हणाले. आमचा अजेंडा नाही अशोकराव पण आम्हाला त्या अजेंड्यावर जाण्यासाठी उचकु नका.
बीजेपीने आपल्या दैनिय अवस्थेत मुखेडकर महाराजांना मतदार संघात फिरवून त्यांना तिकिट मिळणार असा देखावा तयार केला पण ऐनवेळी उपऱ्या उमेदवाराला बीजेपीने तिकिट दिले. याचे कारण समजवून सांगतांना मुखेडकर महाराजांमुळे धर्म आणि संप्रदाय हा प्रश्न विधानसभेत मांडला गेला तर आपला हिंदु मतांचा गठ्ठा कमी होईल या भितीमुळे बीजेपीने महाराजांना तिकिट दिले नाही असे आंबेडकर म्हणले आणि त्यांचा अपमान केला. जनतेने मतदान करतांना निवडुण जाणारे आपले सेवक आहेत आणि आपण या देशाचे मालक आहोत ही बाब लक्षात ठेवायला हवी असे आंबेडकर म्हणाले. उद्यापासून महात्मा गांधीची खिरापत वाटणे सुरू होईल. त्यावेळी ती खिरापत वाटणाऱ्यांना प्रश्न विचारा ज्या अनुसूचित जातीच्या मतदार संघासाठी तुम्ही खिरापत वाटत आहात. तुमच्या उमेदवाराच्या जातीच्या दोन महिलांवर अत्याचार झाला तेंव्हा तुम्ही गेले होते काय.
पोट निवडणुक ही खुर्चीखाली आग लावण्याची परिस्थिती असते. कारण यांना सत्ताच हवी आणि ती मिळाली नाही तर यांची मानसिकता बिघडते आणि पुढे येणारी निवडणुक ही आपल्यासाठी अर्थात मालकांसाठी चांगली राहते असे ऍड. आंबेडकर म्हणले. खुर्चीखाली आग लावली तर चटका कोठे लागतो हे मी सांगायची गरज नाही.
या निवडणुकीत पुन्हा एकदा किनवट घडवा हे सांगतांना शरद पवारांनी 6 कोटी रुपयांचा भिमराव केराम विकत घेता होता असे ऍड. आंबेडकरांनी सांगितले. त्याला पैसेही मिळाले नाहीत कारण धनादेश(चेक) आणि धनाकर्ष (ड्राफ्ट) यातील फरक भिमराव केरामला माहित नसल्यामुळे ही गडबड झाली. मी तरीही त्याला सांगितले होते की, तुझी फसवणूक होणार आहे आणि झाले तसेच आता पुन्हा एकदा किनवट घडवा आणि वंचित बहुजन आघाडीच्या सिलेंडर या निशाणीसमोरील बटन दाबून  30 ऑक्टोबर रोजी  डॉ.उत्तम इंगोले यांन विजयी करा असे ऍड.बाळासाहेब आंबेडकर म्हणाले.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *