क्राईम

22 वर्षीय युवतीचा गळाचिरून खून

नांदेड(प्रतिनिधी)-एका 22 वर्षीय युवतीचा गळाचिरून खून केल्याचा प्रकार आज उघडकीस आला. विमानतळ पोलीसांनी अत्यंत जलदगतीने हालचाल करून यातील मारेकऱ्याला ताब्यात घेतले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसा झेंडा चौक शारदानगर येथे ऍड. हरदळकर यांच्या घरात किरायाने घेतलेल्या खोलीत हा प्रकार घडला. सुरेश उर्फ निनू देविदास शेंडगे (23) रा.पांगरा ता.नांदेड याने वैष्णवी संजय गौड (22) या युवतीचा गळाचिरून खून केला आहे. झालेला प्रकार का घडला याबद्दल तर्कविर्तक सुरू आहेत. कोणी सांगतात हा खून प्रेम प्रकरणातून घडला आहे. पण याला कोणी अद्याप दुजोरा देत नाहीत. विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी आणि अंमलदाराने त्वरीत हालचाल करून मारेकरी सुरेश शेंडगेला ताब्यात घेतले आहे. इतर कायदेशीर प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत पुर्ण झाल्या नव्हत्या.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.