ताज्या बातम्या महाराष्ट्र

गुरूद्वारा बोर्डातील कायद्याच्या सुधारणेसाठी केंद्र, राज्य सरकारसह पाच जणांना नोटीस

पुढील सुनावणी 6 जानेवारी 2022 रोजी
नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा बोर्डाच्या कायद्यातील कलम 11 मध्ये केलेल्या बदलावर राष्ट्रपतीची स्वाक्षरी नाही या युक्तीवादावर भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि शिख गुरूद्वारा बोर्ड या तिघांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमुर्ती एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमुर्ती आर.एन.लड्डा यांनी नोटीस जारी केली आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी 6 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.
नांदेड येथील सरदार मनजितसिंघ जगनसिंघ, सरदार राजासिंघ गुरबचनसिंघ फौजी, सरदार उत्तमसिंघ रामसिंघ, सरदार जगजीवनसिंघ त्रिलोकसिंघ रामगडीया, सरदार गुलाबसिंघ चंदासिंघ कंधारवाले,सरदार  दर्शनसिंघ चरणसिंघ मोटरावाले, सरदार अमरजितसिंघ खेमसिंघ शिलेदार आणि सरदार सुरजितसिंघ जीवनसिंघ गिरणीवाले आदींनी रिट याचिका क्रमांक 11579/2021 दाखल केली. त्यात  अगोदर भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, सचिव विधी विभाग आणि सचिव महसुल व वन विभाग यांना प्रतिवादी करण्यात आले होते.
या प्रकरणात दि.14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत वादींच्यावतीने या प्रकरणात शिख गुरूद्वारा बोर्ड यांना प्रतिवादी करण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने बोर्डाला प्रतिवादी करून पाच प्रतिवादींना नोटीस पाठवली आहे. न्यायालयाने लिहिलेल्या निकालामध्ये वादींचे म्हणणे आहे की, नांदेड शिख गुरूद्वारा सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब नांदेड (सुधारणा) कायदा 2015 मध्ये या कायद्यावर माननीय महामहिम राष्ट्रपती यांची स्वाक्षरी नाही. हा मुळ कायदा 1956 चा आहे. ज्यावर आणि तो केंद्रीय कायदा अस्तित्वात आहे. यानुसार न्यायमुर्तींनी या प्रकरणात नोटीस पाठवली आहे. या रिट याचिकेत वादींच्यावतीने ऍड. गणेश गाडे, केंद्र सरकारच्यावतीने ऍड. ए.जी.तलहर आणि इतर प्रतिवादींच्या वतीने ऍड. डी.आर. काळे हे काम पाहत आहेत.
गुरूद्वारा बोर्डाच्या कायद्यात सन 2015 मध्ये कलम 11 मध्ये सुधारणा करण्यात आली. ज्यानुसार राज्य शासनाला गुरूद्वारा बोर्डावर अध्यक्ष नेमण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. याबाबत नांदेडमध्ये नेहमीच विरोध होत राहतो आणि शासनाला गुरूद्वारा बोर्डावर अध्यक्ष नेमण्याचा अधिकार नाही अशा चर्चा होत राहतात. आता कायद्यात झालेल्या सुधारणेला न्यायालयीन लढाईत काय प्राप्त होते हे पाहण्यासाठी जानेवारी 2022 पर्यंत वाट पाहावी लागेल.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *