महाराष्ट्र

३७७ शाहिद पोलीस जवानांना अभिवादन ….. !

नांदेड,(प्रतिनिधी)- गलवान व्हॅली लद्दाख येथे २१ ऑक्टोबर १९५९ रोजी चिनी सैनिकांनी घात लावून केलेल्या हल्ल्यात एका कर्नलसह २० भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता.हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून देशभर शहीद जवानांना अभिवादन करून मानवंदना दिली जाते. आज त्या दिवसाच्या समरणार्थ पोलीस मुख्यालय नांदेड येथे  आयोजित कार्यक्रमात एका वर्षात आणि आज पर्यंत शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना मानवंदना देण्यात आली.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांची उपस्थिती होती.
         
              आज सकाळी बरोबर ८ वाजता अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात राखीव पोलीस निरीक्षक विजय धोंडगे यांनी दिलेल्या परेड ……. ! या शब्दांनी झाली.सहायक पोलीस उप निरीक्षक विठ्ठल कत्ते यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.त्यानंतर पोलीस जवानांनी शाहिद जवानांना अभिवादन केले. पोलीस वाद्य वृंद आपल्या ठेक्यात शाहिद जवानांना अभिवादन करीत होते.
                           याप्रसंगी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले की,गलवान व्हॅली लद्दाख येथे २१ ऑक्टोबर १९५९ रोजी चिनी सैनिकांनी घात लावून केलेल्या हल्ल्यात एका कर्नलसह वीस जवान शाहिद झाले होते.त्या नंतर आजचा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा होत आहे.आज मागील वर्षातील शाहिद झालेल्या ३७७ जवानांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्व एकत्र जमलो आहोत.आपले कर्तव्य बजावतांना,नागरिकांचे रक्षण करताना आणि त्यांच्या संपत्तीची रक्षा करतांना आपला जीव धोक्यात घालणाऱ्या जवानांचा मला सार्थ आदर आहे.असे प्रमोदकुमार शेवाळे म्हणाले.
                              या नंतर पोलीस जवानांनी बंदुकीतून ती फैरी झाडून अभिवादन केले.बिगुल वाजवून दुःखद धून वाजवण्यात आली.त्यानंतर नांदेड शहर उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक चंद्रसेन देशमुख आणि इतवाराचे डॉ.सिद्धेश्वर भोरे यांनी शाहिद झालेल्या ३७७ जवानांच्या नावांचे वाचन केले. पुढे पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,जिल्हाधिकारी डॉ.विपीन,भोकरचे अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,नांदेडचे अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,बिलोलीचे सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,गृह पोलीस विकास तोटावार,धर्माबादचे पोलीस उप अधीक्षक विक्रांत गायकवाड,देगलूरचे सचिन सांगळे आदींनी पोलीस स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण केले.
                             या प्रसंगी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर,जगदीश भांडरवार,साहेबराव नरवाडे,आनंद नरुटे,अभिमन्यू साळुंके,अनिरुद्ध काकडे,अशोक घोरबांड यांच्यासह अनेक अधिकारी आणि पोलीस अंमलदार उपस्थित होते.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *