नविन नांदेड (प्रतिनिधी)- नविन नांदेडचे पत्रकार किरण देशमुख व पत्रकार संजय देशमुख यांच्या मातोश्री शांताबाई हरिहरराव देशमुख (वय ८५) यांचे दिनांक २० आक्टोबर रोजी अल्पशा आजाराने हडको येथील निवासस्थानी दुपारी एक वाजता निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली नातवंडे असा परिवार असुन सायंकाळी पाच वाजता सिडको येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
