नांदेड

बेटसांगवी गावात लसीकरण जनजागृती तथा महिला आरोग्य जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न !

शुभंकरोती फाउंडेशन,देसाई फाऊंडेशन तथा एस.बी.आय बँकेचा पुढाकार , गावातील बहुसंख्य महिलांची उपस्थिती.
नांदेड,(प्रतिनिधी)- लोहा तालुक्यातील बेटसांगवी या गावी शुभंकरोती फाउंडेशन,देसाई फाऊंडेशन तथा एस.बी.आय बँकेच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण जनजागृती तथा महिलांची मासिक पाळी आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमात गावातील बहुसंख्य मुली व महिलांची उपस्थिती होती.
     सरकारच्या माध्यमातून देशात व राज्यात जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी प्रयत्न केले जात असताना लोकांच्या मनात लसीकरण संबंधी गैरसमजुती तथा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे यामुळेच एका सामाजिक भावनेचा विचार करून शुभंकरोती फाऊंडेशन तर्फे ठिकठिकाणी लसीकरण जनजागृती कार्यक्रम घेतले जाते. बेटसांगवी (ता. लोहा) येथे सुद्धा लसीकरण जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला असून अनेक महिला – मुलींची उपस्थिती होती याचबरोबर महिलांची मासिक पाळी आरोग्य संदर्भात जनजागृती करण्यात आली. यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने महिलांनी काय केले पाहिजे आणि काय टाळले पाहिजे, मासिक पाळीच्या संदर्भात असणारे गैरसमज, समस्या व आहार यासंबंधी फाउंडेशनच्या महिला समन्वयकांनी मार्गदर्शन केले यानंतर मोफत सॅनिटरी नॅपकिन वितरीत करण्यात आले तसेच फाउंडेशनच्या माध्यमातून चालणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती दिली. तसेच या कार्यासाठी अनेक महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
          या कार्यक्रमासाठी गावातील अंगणवाडी कार्यकर्त्या जयश्री काळम व उज्वला लोंढे, आशा वर्कर सविता गोडबोले,सरपंच यशोदाबाई वानखेडे तसेच वसंत वानखेडे व कृष्णा वानखेडे आदींनी सहकार्य केले तर शुभंकरोती फाऊंडेशनचे महिला समन्वयक स्वप्नजा गोरे आणि समन्वयक अभिजीत बारडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यांसोबत समन्वयक चैताली कदम,मीडिया हेड गौरव वाळिंबे आदींची उपस्थिती होती.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *