क्राईम

बेकायदेशीर विद्युत पुरवठ्यामुळे घडला सदोष मनुष्यवध

नांदेड(प्रतिनिधी)-जुलै महिन्यात मरण पावलेल्या एका व्यक्तीचा आकस्मात मृत्यू तपासात आता त्या व्यक्तीचा मृत्यू एका शेतात बेकायदेशीररित्या लावलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे घडला आहे असा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सोनखेड पोलीसांनी दाखल केला. या गुन्ह्यात वापरलेले हत्यार बेकायदेशीर विद्युत पुरवठा आहे.
दि.8 जुलै 2021 रोजी सायंकाळी 6.30 ते 10 जुलैच्या दुपारी 12 वाजेदरम्यान सोनखेड शेत शिवारातील शेत गट क्रमांक 625 मध्ये गणेश विठ्ठलराव बावणे यांच्या शेताजवळ अंकुश मधुकर नरवडे (25) रा.वडेपुरी ता.लोहा या व्यक्तीचे प्रेत सापडले होते. त्यावेळी सोनखेड पोलीसांनी आकस्मात मृत्यू क्रमांक 17/2021 दाखल केला होता.
मरण पावलेले अंकुश नरवडे यांचे बंधू संतोष मधुकर नरवडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गणेश विठ्ठलराव बावणे रा.सोनखेड यांनी आपल्या ऊसाच्या शेतात वन्य जीवांनी जावून पिकांचे नुकसान करू नये म्हणून त्यांचे शेत गट क्रमांक 625 च्या चारही बाजूने तारांचे कुंपन लावून त्यात आकोड्याच्या सहाय्याने बेकायदेशीर विद्युत पुरवठा प्रवाहीत केला. या कामामुळे कोणाचा मृत्यू होवू शकतो. याची जाणिव गणेश विठ्ठलराव बावणे यांना होती आणि नेमके झालेही तेच. त्या विद्युत तारांचा झटका अंकुश नरवडेला लागला आणि त्यांचा मृत्यू झाला.
सोनखेड पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 176/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 304 प्रमाणे दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक चंदनसिंह परिहार अधिक तपास करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *