नांदेड (प्रतिनिधी)- गोदावरी नदीपात्रात एका अनोळखी 35 ते 40 वर्षीय पुरूष व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. या माणसाची ओळख पटविण्यासाठी इतवारा पोलिसांनी शोधपत्रिका जारी केली आहे.
दि. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शहरातील नावघाट परिसरातील सय्यद नुर सय्यद इकबाल यांनी दिलेल्या खबरीनुसार नदीपात्रात एक प्रेत सापडले आहे. इतवारा पोलिसांनी याबाबत आकस्मात मृत्यू क्र. 19/2021 दाखल केला आहे. या आकस्मात मृत्यूचा तपास पोलीस उपनिरीक्षक एम.जे. बेग यांच्याकडे देण्यात आला आहे. या माणसाची ओळख पटावी म्हणून इतवारा पोलिसांनी शोधपत्रिका जारी केली आहे.
सापडलेल्या अनोळखी मयत माणसाचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असावे. त्यांचा रंग सावळा आहे. केस काळे अंदाजे 3 इंच लांब आहेत. उंची 167 सेंमी आहे. बांधा सडपातळ आहे आणि चेहरा गोल आहे. अशा व्यक्तीस कोणी ओळखत असेल तर त्यांनी इतवारा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन इतवाराचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी केले आहे. इतवारा पोलीस ठाण्याच्या दुरध्वनी क्र. 02462 236510 असा आहे. पोलीस उपनिरीक्षक एम.जे. बेग यांचा भ्रमणध्वनी क्र. 8552031560 असा आहे. यावर सुद्धा या अनोळखी मयत माणसाबद्दल माहिती देता येईल.
