क्राईम

​ नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील ‘सिंघम’ च्या गाडीला धडक;जनतेने चारचाकीचा चुराडा केला

‘सिंघम’ चा पाय मोडला ; दुचाकी गाडीच्या नंबरची तपासणी होणे आवश्यक
नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील ‘सिंघम’ चा दुचाकीला काल रात्री चार चाकी गाडीच्या धडकेत अपघात झाला आहे. याघटनेतील ‘सिंघम’ ची दुचाकी पोलीस ठाण्यातील बेवारस गाडी असल्याची खळबळजनक माहिती प्राप्त झाली आहे.पोलीस ठाण्यातील बेवारस दुचाकी गाड्यांचा असाही वापर होतो आहे नांदेड जिल्ह्यातील नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात.पोलीस महासंचालक साहेब आपणाला सुद्धा माहिती नसणार असा गाड्यांचा वापर.आता आपल्याला एक नवीन पद्धत सुरु करावी लागेल या तपासणीसाठी.
                           नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जवळपास १० महिन्यांपासून अत्यंत कडक शिस्तीचे पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोरबांड  हे कार्यरत आहेत.त्यांच्या नांदेड ग्रामीणला येण्या पूर्वी तेथे अनेक दुचाकी गाड्या बेवारस अवस्थेत पडलेल्या होत्या.त्यांनी आल्या आल्या या बेवारस दुचाकी गाडयांना कायदेशीर करण्याची एक नवीन शक्कल लढवली आणि त्याबेवारस गाड्या एका चोरीच्या गुन्ह्यातील निघाल्या होत्या.तो चोर जो कोणी असेल त्याच्या कर्तबगारीत त्यामुळे मोठी भर तेव्हा पडली होती.पण बेवारस दुचाकी गाड्या भेटणे हि प्रक्रिया सतत सुरु राहणारी प्रक्रिया आहे. त्यानुसार गाड्या भेटण्याची प्रक्रिया सुरूच राहिली आणि अनेक गाड्या पुन्हा बेवारस अवस्थेत सापडत गेल्या आणि त्या पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणच्या परिसरात उभ्या राहिल्या.त्यात एक दुचाकी गाडी जरा छान अवस्थेत होती.
                        काल दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ९ ते १० वाजेदरम्यान बळीरामपूर भागात एक अपघात घडला.त्यात एम एच ०२ इ एच ३२९२ या चारचाकी गाडीने दुचाकी क्रमांक एम एच २६ एक्स ८९१६ ला धडक दिली.या दुचाकी गाडीवर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील ‘सिंघम’ उर्फ  ‘स्वीपर’ उर्फ सुनिलजी गर्दनमारे हे स्वार होते.जनतेने ‘सिंघम’ ला धडक देऊन अपघात करणाऱ्या प्रवाशी गाडीचा परवाना असलेल्या चारचाकी गाडीचा चुराडा केला. कारण नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील ‘सिंघम’ सुद्धा काही लहान व्यक्तिमत्व नसतेच ना. या अपघातात ‘सिंघम’ चा एक पाय फ्रॅक्चर झाला आहे.त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
                      आरटीओ कार्यालयाच्या ऍपवर दोन्ही गाड्यांची माहिती शोधली तेव्हा दुचाकी गाडीचा मालक मल्हारी सूर्यवंशी असे दाखवत आहे.त्या दुचाकीची नोंदणी नांदेड जिल्ह्यात २०१० मध्ये झालेली आहे.य दुचाकी गाडीचा विमा ३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत आहे आणि चारचाकी गाडीचा मालक विश्व टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे. नोंदणी परभणी जिल्ह्याची आहे.अत्यंत खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी गेली तीन चार महिन्यांपूर्वी बेवारस या सदरात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आली होती.पण त्या दुचाकीची अवस्था टणटण असल्याने त्याचा वापर करण्याची मुभा ‘सिंघम’ला मिळाली होती.’सिंघम’त्या बेवारस दुचाकी गाडीचा मुक्त वापर करीत होते.
                       बेवारस गाड्या सापडल्या तर त्यांची नोंद करून त्या गाड्या पोलीस ठाण्यात उभ्या असतात.अनेक पोलीस ठाण्यांमध्ये अश्या अनेक गाड्या उभ्या आहेत.पण त्यांचा असा मुक्त वापर करण्याची मुभा असते,हे पहिल्यांदाच समोर आले आहे.असो.आप आपल्या मध्ये असलेल्या बुद्धीचा हा उपयोग असतो.खरे तर या पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना मोठे पद अर्थात जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेचा पदभार मिळणार असल्याची स्वप्ने पडत आहेत.बहुधा त्यामुळे अश्या छोट्या छोट्या घटनांकडे त्यांचे लक्ष नसेल.पण नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील ‘सिंघम’ च्या दुचाकी गाडीला धडक लागल्याची घटना नक्कीच मोठी बातमी बातमी आहे.
‘सिंघम’ च्या दुचाकीवर असलेल्या नोंदणी क्रमांकाची चौकशी होणे आवश्यक आहे.पोलीस महासंचालकांना ती सर्व माहिती मिळाली तर नक्कीच अश्या बेवारस गाड्यांची तपासणी करण्याचे नवीन तंत्र पोलीस महासंचालक संजय पांडे नक्कीच विकसित करतील.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *