नांदेड

बोले सो निहाल सत श्री अकालच्या घोषणांनी आसमंत दुमदुमले

नांदेड(प्रतिनिधी)-कोरोना काळानंतर आज पहिल्यांदा हल्ला-महल्ला मिरवणूक बोले सो निहाल सत श्री अकालच्या घोषणांनी साजरा झाला. देशभरातून आजच्या या सणासाठी हजारो भाविकांचे नांदेडमध्ये आगमन झाले.
कोरोना काळात हल्ला-महल्ला मिरवणूक काढावी, न काढावी यावर बऱ्याच चर्चा झाल्यानंतर आज दसऱ्याच्या दिवशी दुपारी 4 वाजता सचखंड श्री हजुर साहिब येथून पंचप्यारे साहिबान यांनी अरदास करून हल्ला-महल्ला मिरवणूकीला सुरूवात केली. या मिरवणूकीत देशभरातून आलेले अनेक दलांचे प्रमुख आपल्या अनुयांसह सहभागी झाले होते. हळूहळू मिरवणूक सायंकाळी 5 वाजता महाविर चौक येथे पोहचली. तेथे अरदास झाली आणि त्यानंतर प्रतिकात्मक हल्ला करण्यात आला. बोले सो निहाल सत श्री अकालच्या घोषणांनी आसमंत दुमदुमले. सचखंड येथील अश्व आणि बाहेरून आलेले अश्व या मिरवणूकीत सहभागी झाले होते. एका संतांच्या दलातील एक गजराज या मिरवणूकीचे आकर्षण होते.
हल्ला-महल्ला मिरवणूकीत पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांच्या नेतृत्वात असंख्य पेालीस अधिकारी आणि अंमलदारांनी या मिरवणूकीच्या सोबत दसरा साजरा केला.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *