नांदेड

बळीरामपूर, वाजेगाव, धनेगाव आणि तुप्पा या गावांना पाण्यासाठी फिरावे लागते  वणवण

नांदेड(प्रतिनिधी)-पावसाने भरपूर हजेरी लावल्यानंतर सुध्दा शहराच्या जवळ असलेल्या बळीरामपूर, धनेगाव, वाजेगाव आणि तुप्पा या चार गावांमध्ये गेली दीड महिना पाण्याचे दुर्भीक्ष सुरू आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने पाणी पुरवठा लवकर सुरू केला नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा अनेक ग्राम पंचायत सदस्यांनी दिला आहे.
बळीरामपूर, धनेगाव, वाजेगाव आणि तुप्पा येथील जनतेने दिलेल्या माहितीनुसार या चार गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत असल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. या गावांची पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने जिल्हा परिषद नांदेडकडे हस्तांतरीत केली आहे. आज त्या हस्तांतरणाला 5 ते 6 वर्ष झाले आहेत. तरीपण जिल्हा परिषदेला पाणी पुरवठा सुरळीत करता आलेला नाही. कधी पाणी येते तर कधी येत नाही. सध्याच्या परिस्थितीत वीज पुरवठ्याचे चार कोटी 20 लाख रुपये थकल्यामुळे या गावांचा वीज पुरवठा बंद आहे. यातही तडजोड करण्यात आली असून चार गावांनी प्रत्येकी 10 लाख रुपये भरावेत असे 40 लाख रुपये भरावेत असे सांगण्यात आले आहे. बळीरामपूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपंच ही दोन्ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासकाकडे कारभार आहे. ग्राम पंचायतचा अभिलेख लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे जमा असल्यामुळे रक्कम भरण्यासाठी असमर्थता दर्शवली जात आहे. या भागातील नागरीकांना क्षारयुक्त पाणी मिळत आहे. औद्योगिक वसाहतीतून अनेक कारखान्यांमधून पाणी आणावे लागत आहे. अशा परिस्थितीत ही चार गावे जगत आहेत.
आमदार, जिल्हा परिषद सदस्य व इतर प्रतिनिधी बघ्याची भुमिका घेत आहेत. लवरकच पाणी पुरवठा सुरूळीत केला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा ग्राम पंचायत सदस्य इंद्रजित पांचाळ, मधूकर आढाव, शिध्दोधन एंगडे, धम्मदिप एंगडे, किशन गव्हाणे, अशोक वाघमारे, गोविंद सुनकेवार, गणेश जिंदम, संजय सोनकांबळे, शिवहार धातुरे, विजय हटकर, गोविंद जाधव, शेख सलीम आणि गुणाबाई पंडीत यांनी दिला आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *