नांदेड(प्रतिनिधी)-दसऱ्याच्या दिवशी 730 कोरोना अहवाल तपासणीमध्ये नांदेडमनपा हद्दीत फक्त एक कोरोना बाधीत नवीन रुग्ण सापडला आहे.
प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार 15 ऑक्टोबर रोजी एकाही रुग्णाचा कोरोना बाधेने मृत्यू झालेला नाही. आज मनपा अंतर्गत गृहविलगिकरणातून एका रुग्णाची सुट्टी झाली आहे. आज 730 अहवाल तपासण्यात आले. त्यातील 712 निगेटीव्ह आहेत आणि एक अहवाल पॉझिटीव्ह आहे. सापडलेला नवीन रुग्ण मनपा हद्दीतील आहे.
आज 17 स्वॅब नाकारण्यात आले आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णाची आजची संख्या 21 आहे. आज अतिगंभीर स्वरुपात तीन रुग्ण आहेत.
