जनतेने पासदगाव, झरी, गाडेगाव येथे दुर्गाविसर्जन करावे
नांदेड(प्रतिनिधी)-गोदावरी नदी घाटांवर यंदा दुर्गादेवी मुर्ती विसर्जनसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. यासाठी पर्यायी व्यवस्था झरी, पासदगाव, गाडेगाव या तीन ठिकाणी करण्यात आली आहे. जनतेने या तिन ठिकाणी दुर्गामुर्तींचे विसर्जन करावे आणि प्रशासनास सहकार्य करावे असे महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने कळविले आहे.
आज दि.14 ऑक्टोबर रोजी उपायुक्त शुभम क्यातमवार यांनी दुर्गामुर्ती विसर्जन संदर्भाने आयोजित केलेल्या बैठकीत गोदावरी नदीच्या गाठांवर दुर्गामुर्ती विसर्जनास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून झरी, पासदगाव, गाडेगाव येथे दुर्गामुर्तींचे विसर्जन करावे असे प्रसिध्दीसाठी पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे. निर्माल्य संकल्नासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. क्षेत्रीय अधिकारी व स्वच्छता निरिक्षकांनी आप-आपल्या भागातील दुर्गा मंडळांना भेटी देवून त्यांना दुर्गामुर्तीचे विसर्जन झरी-पासदगाव, गाडेगाव या ठिकाणी करण्यासाठी माहिती द्यावी. विसर्जनाच्या ठिकाणी मनपाचे कर्मचारी उपस्थितीत राहतील.
या बैठकीत सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक, संजय जाधव, रईसोद्दीन, अविनाश अटकोरे, रमेश चौरे यांच्यासह स्वच्छता विभाग, विद्युत विभाग, यांत्रिकी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
