महाराष्ट्र

आयपीएल चालवणारे बुक्की, आयपीएल खेळणारे जुगारी यांना दसऱ्याच्या दिवशी शेवटची संधी

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2021 च्या आयपीएल महावेळाव्यात उद्या दसऱ्याचा दिवस सर्व बुक्कींसाठी यावर्षाची शेवटची संधी आहे. यातून अमाप धनसंपत्ती कमावता येईल. आयपीएल संपले तरी पुढे वर्ल्डकप येणारच आहे. दसऱ्याच्या दिवशी सोन वाटण्याची प्रथा आहे. आयपीएल जुगाऱ्यांना सोन देण्याची आणि बुक्कींना सोन कमावण्याची ही संधी अत्यंत महत्वाच्या दिवशी आली आहे.
सन 2021 च्या आयपीएल हंगाम आता शेवटच्या टप्यात आला असून उद्या दसऱ्याच्या दिवशी दि.15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता सीएसके(चेन्नई सुपर किंग) आणि केकेआर(कोलकत्ता नाईट रायडर्स) या दोन संघांमध्ये अंतिम सामना होणार आहे. जगभरातील क्रिकेट खेळाडू आयपीएल स्पर्धेमध्ये विविध संघाचे खेळाडू म्हणून आपल्यातील कसब दाखवले. 20-20 अशा 40 षटकांच्या सामन्यात लवकरात लवकर धावा बनवणे, लवकरात लवकर चांगल्या धावा बनवणारा खेळाडू बाद करणे या दोन महत्वांच्या कसबांवर सामन्याचे भविष्य असते.
अशा सामन्यांना जुगारामध्ये बदलून माफियांनी त्यातून धंदा तयार केला. या धंद्यातील हिस्सा अनेकांना दिला जातो. त्यात राज्यात सुर्याजी पिसाळांसारखे अनेक लोक आहेत. जे या हिस्सासाठी मर-मर करत असतात. तसेच सुर्याजी पिसाळांनी आपले कांही पिट्टू या कलेक्शनसाठी लावलेले आहेत. त्यांना पोलीसाची नोकरी नाही तर कलेक्शन करणे हिच मुळ जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या कामाकडे, त्यांच्या ड्युटीकडे कोणाचे लक्ष नसते. कारण त्यांच्याकडे लक्ष दिले तर सुर्याजी पिसाळ आपले वाईट करेल ही भिती असते आणि अशा भितीत हा आयपीएल कलेक्शनचा धंदा सुरू असतो.
उद्या भारतीय संस्कृतीतील मोठा दसरा सण आहे. सांस्कृतीक भाषेमध्ये दुर्जनांवर सत्याचा विजय असा या सणाचा उल्लेख होत असतो. पण घडत उलटेच असते. त्यात आपल्याला काय मिळेल यावरच लक्ष केंद्रीत केले जाते. उद्या सीएसके आणि केकेआर यांच्या सामन्याने आयपीएलचा शेवट होणार आहे. त्यामुळे ही शेवटची संधी सर्वांसाठी आहे. जे आयपीएलमधून पैसे कमावतात, जे आयपीएलच्या कमावलेल्या पैशातून हिस्सा मिळवतात त्यांच्यासाठी दिवाळीपुर्वीचा हा शेवटचा मोठा घबाड उद्या होणार आहे. सर्वांना आयपीएलच्या शेवटच्या संधीसाठी शुभकामना देतांना आयपीएल संपल्यावर कांही दिवसांतच क्रिकेटची जागतिक चषक स्पर्धा सुरू होणार आहे. त्यासाठी आतापासूनच होणाऱ्या सामन्यांवर जुगार सुरू झालेला आहे. त्यांनाही शुभकामना.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.