क्राईम

29 मार्चच्या घटनेतील 15 जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला

नांदेड(प्रतिनिधी)- दसरा सणाच्या दोन दिवस अगोदर 29 मार्च रोजीच्या घटनेतील एकूण 14 जणांना जामीन दिल्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.डी. खोसे यांनी जारी केले आहेत. शिख समाजात यामुळे समाधानाचे वातावरण पसरले आहे.
29 मार्च रोजी पोलिसांवर हल्ला झाल्याचे दोन वेगवेगळे गुन्हे आणि तिसरा एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी 30 मार्च रोजी जवळपास 20 जणांना आणि पुढे 1-1 असे करून 28 लोकांना अटक केली होती. अटक केलेल्या अनेक जणांच्या जामीन अर्जावर नकार घंटाच आली होती. पुढे विहीत वेळेत 28 अटकेत असलेले आरोपी आणि जवळपास 75 फरार आरोपी अशा स्वरूपाचे दोषारोपत्र न्यायालयात दाखल झाले. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम न्यायाधीश एन.डी. खोसे यांनी दोन जणांना जामीन दिला. त्यानंतर हळूहळू ही जामीन प्रक्रिया पुढे जात गेली.
जवळपास गेली सहा महिन्यांपासून तुरूंगात असलेल्या 15 जणांना आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.डी. खोसे यांनी जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झालेल्या लोकांची नावे हरनिकसिंघ मुन्नासिंघ तोपची, सुलिंदरसिंघ उर्फ मोनू रूपसिंघ रायके, जसवंतसिंघ उर्फ चन्नू सिरपल्लीवाले, प्रतापसिंघ उर्फ छोटू सिरपल्लीवाले, अमरजितसिंघ उर्फ अमन सिरमपल्लीवाले, बलवंतसिंघ सुलतानसिंघ टाक, गोविंदसिंघ उर्फ गोविंद सोडेवाला, जगजितसिंघ उर्फ राजा घडीसाज, इंदरसिंघ भट्टी, सुखासिंघ बावरी, हरप्रितसिंघ ग्रेवाल, मनिंदरसिंघ लांगरी, विक्रमजितसिंघ सेवादार, हरभजनसिंघ पहरेदार, अमरजितसिंघ उर्फ राजू महाजन अशी आहेत.
या गुन्हा 114 मधील आता तुरूंगात राहिलेला एकच व्यक्ती शिल्लक आहे. 30 मार्च रोजी अटक केलेले आणि त्यानंतर अटक केलेले सर्वजण न्यायालयाने जामीनावर मुक्त केले आहेत. तुरूंगात असलेल्या या लोकांकडून ऍड. रमेश परळकर, ऍड. ज्ञानेश्वर हंडे, ऍड. राजू कांबळे, ऍड. अमनदिपसिंघ कामठेकर, ऍड.मनप्रीतसिंघ ग्रंथी ,ऍड. वासरीकर यांनी काम पाहिले. दसरा सणाच्या 36 तास अगोदर एकदाच 15 जणांनी तुरूंगात सुटका होण्याचे आदेश झाल्याने याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.