महाराष्ट्र

20 ऑक्टोबरपासून महाविद्यालयातील वर्ग नियमीत सुरू होणार

नांदेड (प्रतिनिधी)- येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थ सहाय्यीत विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नीत सर्व महाविद्यालयातील नियमीत वर्ग सुरू करण्यासाठी 20 ऑक्टोबर 2021 पासून मान्यता देण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी प्रविणकुमार पवार यांनी आपली डिजीटल स्वाक्षरी करून शासन परिपत्रक निर्गमीत केले आहे.
राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावीचे नियमीत वर्ग 4 ऑक्टोबर 2021 पासून सुरू करण्यात आले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी हे 28 वर्षांवरील असतात. आजपर्यंत देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत बहुतेक विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले असेल. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नीत सर्व महाविद्यालये कोवीड प्रतिबंधात्मक उपाययोजना करून नव्याने 20 ऑक्टोबरपासून वर्ग सुरू करू शकतील.
शासनाने परवागनी दिली असली तरी स्थानिक प्रशासन प्राधीकरणाशी चर्चा करून महाविद्यालय 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने सुरू करण्याबाबत निर्णय घ्यायचा आहे. 18 वर्षांवरील ज्या विद्यार्थ्यांनी कोवीड-19 च्या लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तेच विद्यार्थी, विद्यार्थीनी महाविद्यालयात व विद्यापीठात उपस्थित राहू शकतील.यापेक्षा इतर परिस्थितीमध्ये स्थानिक प्राधीकरणांसोबत चर्चा करून महाविद्यालयांनी निर्णय घ्यायचा आहे. विद्यापीठ स्तरावर मार्गदर्शक सुचना देण्यात याव्यात. जे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहणार नाहीत, त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध द्यावी. ज्या महाविद्यालयात लसीकरण शिल्लक असेल त्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून लसीकरण पुर्ण करून घ्यावे. हे परिपत्रक शासनाने संकेतांक क्रमांक 202110131646015508 नुसार शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.