नांदेड (ग्रामीण)

भोकर फाटा येथील अपघातास राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व गुत्तेदार जबाबदार असुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करा-अँड.किशोर देशमुख

नांदेड(प्रतिनिधी)-  नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रं. ३६१ नांदेड-अर्धापूर रस्त्याचे काम करणारे गुत्तेदार, संबंधीत अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे व हलगर्जीपणामुळे मागील दोन महिन्यात मोटार अपघातात सहा लोकांचा बळी गेले आहेत या अपघातास दोषी असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व गुत्तेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अँड.किशोर देशमुख यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रं. ३६१ वर नांदेड ते अर्धापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचा काम चालू असून  काम करणारे कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी भर पावसाळ्यात रस्त्याचे काम सुरू केल्याने या रस्त्यावरील प्रवास करणाऱ्या नागरीकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सदरील काम सुरू करत असतांना कंत्राटदार (के.टी. कन्स्ट्रक्शन) कंपनी व संबंधीत अधिकाऱ्यांनी दूतर्फा रस्त्यापैकी एक बाजू नांदेड ते भोकरफाटा पर्यंत खोदून ठेवले आहे. अवजड वाहन व मोठी वाहतूक दुसऱ्या बाजूने एकाच रस्त्यावर चालू असल्यामुळे त्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी ज्या बाजूने वाहतूक चालू आहे त्या रस्त्यावरील खड्डे बुजविणे व त्यावर कारपेट मारणे सुरक्षेच्या दृष्टीने अपेक्षीत होते.  रस्त्यावरील खड्यामुळे गिट्टी,चुरी धुरडाणे जिव मुठीत धरून या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे.
गेल्या दोन महिन्यात वेगवेगळ्या अपघात सहा जणांचा मृत्यू झाला असून सहा कुटूंब आपल्या प्राणप्रिय व्यक्तीला मुकले असुन सर्व अपघातात बळी जाण्यास कंत्राटदार कंपनी व संबंधीत अधिकारी त्यांचा निष्काळजीपणा व हलगर्जीपणा कारणीभूत असल्याने त्यांच्यावर भारतीय दंड संहिता अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्त्यावरील प्रवाश्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने भोकरफाटा दाभड येथे पुलाचे काम चालू असून त्यासाठी पिल्लर बांधकामासाठी रस्त्यात मोठे खड्डे करण्यात आलेले आहे त्यात साचलेले पाणी कंत्राटदार पाईपलाईनद्वारे बाजूला नेऊन सोडणे किंवा टँकरद्वारे दूर नेऊन टाकणे अपेक्षीत आहे परंतू  पाणी कंत्राटदार हे रस्त्यावर सोडत असल्याने रस्त्यावर चिखल होऊन त्यातही अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे कंत्राटदाराने या पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी व भोकरफाटा ते अर्धापूरच्या चालू असलेल्या रस्ता तात्काळ दुरूस्ती करून प्रवाशांना सुरक्षित प्रवास होईल असी संबंधितांनी दक्षता घ्यावी. तसेच या रोडवर रोज वाहतूक कोंडी होत असून त्यासाठी कंत्राटदारानी स्वतंत्र सुरक्षा पथक नेमून वाहतूक सुरळीत करावी किंवा पोलीस खात्याकडे योग्य ती रक्कम भरून पोलीसाचे सुरक्षा पथक या महामार्गावर तैनात करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली असून बेजबाबदार राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व गुत्तेदारावर कार्यवाही तात्काळ गुन्हे दाखल करावे गुन्हे दाखल न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अँड किशोर देशमुख यांनी दिला आहे.
 निवेदन अर्धापूर तहसीलदार उज्वला पांगरकर यांच्या मार्फत दि.१३ रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले.निवेदनाच्या प्रति उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड ग्रामीण,पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे अर्धापूर यांना दिल्या आहेत. या निवेदनावर भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अँड किशोर देशमुख,अवधूत कदम,युवा नेते विराज देशमुख,शहराध्यक्ष विलास साबळे,नगरसेवक शिवराज जाधव,प्रसार प्रचार तालुकाध्यक्ष तुळशीराम बंडाळे,कुश भांगे,साहेबराव डोलारकर,संजय डुबे, देविदास राऊत,विजय गवारे,नंदकुमार शितळे आदीसह अनेकांच्या सह्या आहेत.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *