नांदेड

दुर्गा आष्टमीच्या दिवशी नांदेडच्या चौदाव्या महापौर म्हणून जयश्री पावडे यांनी काम सुरू केले 

नांदेड(प्रतिनिधी)-आज दुर्गा आष्टमीच्या मुहूर्तावर कॉंग्रेस पक्षाच्या जयश्री पावडे यांनी महापौर पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ताकीद दिली आहे की, नागरीकांची कामे करा अन्यथा कार्यवाहीला सामोरे जावे लागले. 
                    नांदेडमध्ये कॉंगे्रसची निर्विवाद सत्ता आहे. ठरल्याप्रमाणे महापौर पदाचा कार्यकाळ अडीच वर्षाचा होता. त्यानुसार मोहिनी येवनकर यांनी 13 व्या महापौर पदाचा राजीनामा 30 सप्टेंबर रोजी दिला होता. त्यानुसार पुढील महापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली. 9 ऑक्टोबर रोजी कॉंगे्रस पक्षाच्यावतीने फक्त जयश्री निलेश पावडे यांचाच अर्ज आला होता. त्यामुळे महापौरपदी त्यांची निवड होणार हे निश्चितच झाले होते. पण निवडणुक कार्यक्रमानुसार त्याची प्रक्रिया आज पुर्ण झाली आणि जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी 14 व्या महापौर म्हणून जयश्री निलेश पावडे यांच्या नावाची घोषणा केली. 
                   
       आज आपला 14 व्या महापौर पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर जयश्री निलेश पावडे यांनी सांगितले की, मनपाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनतेची कामे करायची आहेत. त्यात कुठे कमतरता राहिली तर त्यांना कार्यवाहीला सामोरे जावे लागेल. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पाहिले विकासाचे स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे असे जयश्री पावडे म्हणाल्या. सध्या सुरू असलेली पाणी पुरवठ्याची कामे, मलनिसारण वाहिन्यांची कामे लवकरात लवकर करून रस्त्यावर पडलेले खड्डे दुरूस्त केले जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाकडे शहराचा आराखडा पाठविला जाईल त्यात मोकळ्या जागांवर क्रिडांगणे उभारून विविध खेळांना चालना दिली जाईल असे सांगितले. 
                    महापौर पदी निवड झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.विपीन, मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी महापौर मोहिनी येवनकर, शैलजा स्वामी, किशोर स्वामी, विजय येवनकर, विठ्ठल पाटील, डॉ.दिनेश निखाते, माजी सभापती शिला निखाते, नगरसेवक संदीप सोनकांबळे यांच्यासह अनेकांनी त्यांना महापौर पदाच्या जबाबदारीसाठी शुभकामना दिल्या. 
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *