क्राईम

चार वर्षापासून खूनाच्या आरोपात तुरूंगावास भोगणारा आरोपी न्यायालयाने सोडला 

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2017 मध्ये नदीकाठी सापडलेल्या प्रेताच्या संदर्भाने अनोळखी मारेकऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला. पोलीसांनी मयताच्या मोबाईल वापरणारा माणुस मेहनतीने पकडला. त्याच्याविरुध्द न्यायालयात खूनाचा खटला मात्र सिध्द झाला नाही. त्यामुळे गेली साडे चार वर्ष तुरूंगात असणारा हा आरोपी निर्दोष सुटला. या प्रकरणात ऍड. अनुभव डोणगे यांनी विधीसेवा प्राधिकरणच्यावतीने या मारेकऱ्याचा खटला चालविला होता.
                     दि.6 मे 2017 रोजी गोदावरी नदीकाठी एका अनोळखी 27 वर्षीय युवकाचे प्रेत सापडले. त्याच्या डोक्यावर भरपूर जखमा होत्या आणि त्या जखमांनीच त्याचा मृत्यू झाला होता. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी अज्ञात माणसाला अज्ञात मारेकऱ्यांनी खून केल्याचा गुन्हा क्रमांक 157/2017 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पेालीस निरिक्षक आनंद झोटे यांनी सुरू केला होता. या प्रकरणाचे दोषारोप पाठवले पर्यंत या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल बडे यांच्याकडे गेला होता.
                   मयत अनोळखी मारेकरी अनोळखी या अशा प्रकरणात सुरू झालेला हा तपास रहस्यमय आहे. या प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी आहे की, मुळ तेलंगणा राज्यातील कामारेड्डी  जिल्ह्यातील ईबितवार कुटूंबिय देगलूरमध्ये राहते. त्यांचा मुलगा नागनाथ उर्फ नागेश इरन्ना ईबितवार हा 5 मे 2017 रोजी घरातून गेला होता. तो सापडलाच नाही. म्हणून 16 मे 2017 रोजी नागेश उर्फ नागनाथचे वडील ईरन्ना सायन्ना ईबितवार यांनी देगलूर पोलीस ठाण्यात आपला मुलगा घरातून गेला आणि परत आला नाही. अशा स्वरुपाची हरवल्याची नोंद केली.
                  वजिराबाद पोलीसांनी त्या हरवलेल्या प्रकरणातील व्यक्ती हा आपल्याकडे 6 मे रोजी सापडलेल्या अनोळखी व्यक्तीसोबत जुळतो आहे. हे पाहुन ईरन्ना सायन्ना ईबितवार यांना बोलावले. दरम्यान वजिराबाद पोलीसांनी विहित वेळेपर्यंत वाट पाहून मयत प्रेतावर अंतिम संस्कार केले होते. सायन्ना ईबितवार नांदेडला आल्यावर त्यांनी मयताचे फोटो त्याची अंगठी पाहुन मयत हा आपला मुलगा नागेश उर्फ नागनाथ ईरन्ना ईबितवार होता याची खात्री केली. सायन्नानी मयत मुलाला ओळखल्यानंतर त्याच्याकडे असलेला मोबाईल नंबर पोलीसांना दिला. त्यावर तांत्रिक मदतीच्या सहाय्याने पोलीसांनी हे शोधले की, मयत नागेशचा मोबाईल बिदर येथे आहे. पोलीसांनी बिदर येथे जावून मोबाईल वापरणारा जसवंतसिंघ उर्फ जस्सा महेंद्रसिंघ ढिल्लो रा.अमृतसर पंजाब यास पकडले होते. त्याने पोलीसासमक्ष मीच नागेश ईबितवारचा खून केल्याचे मान्य केले होते.
                      पोलीसांनी त्याच्याकडून नागेशचा खुन करतांना वापरलेले लोखंडी रॉड हे हत्यार जप्त केले. मोबाईल जप्ती केली आणि 45 साक्षीदारांच्या.यादीसह जिल्हा न्यायालय नांदेड येथे जसवंतसिंघ ढिल्लो (वय 28) याच्याविरुध्द दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयात जसवंतसिंघच्यावतीने कोणी वकील देण्यात आला नाही. तेंव्हा न्यायालयाने या प्रकरणात आरोपी जसवंतसिंघच्यावतीने ऍड.अनुभव डोनगे यांची नियुक्ती त्याचा वकील म्हणून केली. विधीसेवा प्राधिकरण नांदेडने अनुभव डोणगे यांना तसे पत्र दिले. अटक झाली तेंव्हापासून जसवंतसिंघ ढिल्लो तुरूंगातच होता. पुर्णपणे परिस्थिती जन्य पुरावा आणि करण्यात आलेली हत्यार व मोबाईल जप्ती या आधारावर सरकार पक्षाने जसवंतसिंघ विरुध्द हा खटला चालवला. एकूण 7 साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. उपलब्ध असलेलेला परिस्थिती जन्य पुरावा आरोपी जसवंतसिंघला खून करणारा आरोपी असे सिध्द करण्यासाठी पुरेसा नाही असे आपल्या निकाल पत्रात लिहुन नांदेडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक घामेचा यांनी जसवंतसिंघची खूनाच्या खटल्यातून मुक्तता केली आहे. न्यायालय परिसरात ऍड. अनुभव डोणगे यांनी विधीसेवा प्राधिकरणच्या वतीने हा खटला चालवून घेतलेल्या मेहनतीची प्रशंसा होत आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *