शेती

सोयाबीन साठा नियंत्रीत केला तर शेतकरी संघटना आंदोलन करेल-ललित बहाळे

नांदेड(प्रतिनिधी)-शेतकरी विषयक सुरू असलेले आंदोलन आता पुर्णपणे राजकीय झाले आहे. असंख्य दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी फाईव्हस्टार आंदोलन हे शेतकरी करू शकत नाहीत त्यामागे मोठे राजकीय पाठबळ असल्याचे मत शेतकरी संघटनेचे नुतन अध्यक्ष ललित बहाळे यांनी व्यक्त केले. सध्या सोयाबीनवर साठा मर्यादा आणली असून राज्य शासनाने ती साठा मर्यादा कायम करू नये नसता शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल आणि मोठे आंदोलन उभे करील असे ललित बहाळे म्हणाले.  भारतीय शेतीमध्ये जैवतंत्रज्ञान जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत शेतकरी मागासलेलाच राहिल असे ललित बहाळे म्हणाले.
शेतकरी संघटनेच्यावतीने आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ललित बहाळे बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल धनवट, प्रवक्ता सिमा नरोडे, गुणवंत पाटील हंगरगेकर, सुधीर बिंदू यांची पत्रकार परिषदेत उपस्थिती होती.
शेतकऱ्यांसाठी आणलेल्या कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर त्याबद्दल बोलतांना ललित बहाळे म्हणाले त्या ठिकाणी सुरू असलेले आंदोलन हे फाईव्हस्टार आंदोलन आहे. शेतकरी आंदोलन करू शकत नाही. दोन राज्यांसाठी ज्या मागण्या होत आहेत. त्या मागण्यांची भारतातील शेतकऱ्यांचा कांही एक संबंध नाही. तेथे शेतकऱ्यांना असलेल्या फाईव्हस्टार पाहता या आंदोलनाचे स्वरुप राजकीय झाले असून त्या मागे कोणाचे तरी पाठबळ आहे, असे ललित बहाळे म्हणाले. लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या सांडलेल्या रक्तावर आता राजकारण सुरू झाले आहे असे मत ललित बहाळे यांनी व्यक्त केले.


कोविड कालखंडामुळे बाजार पेठ कोलमडली आहे. आज पॅनकार्ड धारक कोणताही भारतातील व्यक्ती शेतकऱ्यांचा माल विकत घेवू शकतो. यामुळे एपीएमसीच्या जोखडातून शेतकऱ्याची मुक्तता झाली आहे. पण त्या कायद्याप्रमाणे नाशवंत शेती मालाचा भाव 100 पटीने वाढला तर त्यात सरकार हस्तक्षेप करते  आणि यातच शेतकरी कायद्यांचे काळे लपलेले आहे. अनाशवंत शेतमालाचा भाव 50 पट्टीने वाढला तर त्यातही सरकार हस्तक्षेप करू शकते. यावरूनच केंद्र शासनाने राज्य शासनाला सोयाबीन साठ्यावर नियंत्रण करण्यासाठी सांगितले आहे. असे केले तर त्या सोयाबीन पिकावर अवलंबून असलेल्या असंख्य संस्थांचा ऱ्हास होईल. त्या संस्था मागे पडतील आणि अनेकांवर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे सोयाबीन साठ्यावरील नियंत्रणाचा विचार राज्य शासनाने करू नये नाही तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल आणि मोठे आंदोलन उभे करेल. शेतकरी छोट्या-छोट्या पॅकींगमध्ये आपले पिक विकेल तर त्याचा दर आपोआप वाढेल पण एपीएमसीमुळे हे अशक्य आहे.
एमएसपीच्या बद्दल बोलतांना ललित बहाळे म्हणाले, एमएसपी नेहमीच किमान विचार करते. खरे तर शेतकऱ्यांसाठी कमाल विचार होण्याची गरज आहे. खल्ली हा जनावरांचा खाद्य प्रकार निर्यात होतो. साठ्यावर नियंत्रण आणले तर हा प्रकार बंद होईल. म्हणजे पुन्हा खल्ली आयात करावी लागेल आणि त्यामुळे भारतातील दर खाली पडतील. अवर्षण आणि अतिवृष्टी यातून सावरण्यासाठी जैवतंत्रज्ञान विज्ञान खुप आवश्यक आहे. हवा तो गुण जैवतंत्राने आपल्याला दुसऱ्यात टाकता येतो आणि म्हणून या जैवतंत्रज्ञानाची गरज मोठी आहे. आज अतिवृष्टीची नुकसान भरपाई मागणी करणे आणि ती मागणी पुर्ण करण्यासाठी सरकारची ऐपत आहे तेवढी मदत देणे हा राजकीय भाग आहे. शासनाने साहित्याची किंमत कमी करून गरीबी कमी होत नाही तर नागरीकांच्या खिशात पैशांची वाढ केली तरच खऱ्या अर्थाने गरीबी कमी होते असे ललित बहाळे म्हणाले.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *