क्राईम

माहूर येथील दत्तशिखर घाटात भाविकांचे वाहन उलटून अपघात

6 गंभीर, 7 किरकोळ जखमी !
माहूर(प्रतिनिधी)- भाविकाचे वाहन उलटून झालेल्या अपघातात 6 जण गंभीर व 7 जण किरकोळ जखमी झाल्याची घटना दि.10 रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान घडली.
माहूर लगत असलेल्या बाबा शेख फरीद दर्गाह येथे दर्शनासाठी जात असलेला टाटा छोटा हत्ती वाहन क्र. एम.एच.04 एम.जे. 0551 या वाहनाने आर्णी जि.यवतमाळ येथील भाविक दर्शनासाठी जात असतांना दत्तशिखर ते दत्तमांजरी घाटातील कमंडलु कुंडालगत पलटी झाल्याने वाहतील 13 जन जखमी झाले आहेत. त्यापैकी 6 जन गंभीर जखमी असून त्यांना माहूर येथील ग्रामीण रुग्नालयात डॉ.उदय काण्णव यांनी प्रथमोपचार करून यवतमाळला अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. सात जणावर माहूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.
या अपघाता स.इरफान स.मन्सूर (28),शे.मदरोद्दिन (70), रहीमखान शे.रज्जाक (30),फय्याज शे.मुनाफ (13), मुजीनखान नूरखान (45) शरीफ शब्बीर शेख (28) या सहा जणांना अधिक उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले असून स.फारूक स.शेख (26), शे.शब्बीर शे.मस्तान (45), रुखसूनबेगम सुभेदारखान (40), शे.अहेमद शे.हनीफ (52), शे.खाजा शे.अजीज (35), साजिद मलनस हारून (35), आयनखान पठाण अमन (11) आदीवर ग्रामीण रुग्णालय माहूर येथे उपचार सुरु आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *