नांदेड(प्रतिनिधी)-दि.9 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हा शाखेच्या नेतृत्वात काम करणाऱ्या खास पथकाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाला बंदुकीसह ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खास पथकातील पोलीस उपनिरिक्षक दशरथ आडे, त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार जसपालसिंघ कालो, बोधगिरे, दासरे, शेख इजराईल आणि अकबर पठाण असे पथक नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करीत असतांना दुधडेअरी जवळ एका युवकाकडे बनावट पिस्टल असल्याची माहिती प्राप्त झाली. खास पथकाने त्या युवकाला ताब्यात घेतले. त्याचे नाव नितेश केशव डोंगरे (28) रा.बळीरामपूर असे आहे. त्याच्या ताब्यात एक बनावटी पिस्तुल आणि एक जीवंत काडतुस सापडले आहे. जसपालसिंघ कालो यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात नितेश डोंगरेविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिस्तूल पकडणाऱ्या खास पथकाचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले आहे.
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे शिवाजीनगर, इतवारा, विमानतळ येथे विविध चोऱ्या करणाऱ्या चार जणांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केले आहे. पुढील कार्यवाहीसाठी हे सर्व आरोपी आणि त्यांच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल संबंधीत पोलीस ठाण्याला देण्यात आला आहे. पोलीस खात्यातील जनसंपर्क विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार 16 मे रोजी नवनाथ भारती यास मराठा बार जवळ तलवारीचा धाक दाखवून 700 रुपये […]
नांदेड(प्रतिनिधी)-एका 60 वर्षीय महिलेला गणपती मंदिर बहाद्दरपुरा येथे दोन चोरट्यांनी फसवणूक करून त्यांची 12 ग्रॅमची सोन्याची पोत, 20 हजार रुपये किंमतीची लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. 25 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता गणपती मंदिर बहाद्दरपुरा ता.कंधार येथे गंगाबाई संभाजी वंजे (60) ह्या दर्शनासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी दोन 30 ते 35 वयोगटाचे युवक आले. त्यांनी […]
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या मुलीच्या इलाजासाठी पुण्याला जाणे एकाला महागात पडले आणि चोरट्यांनी त्याचे घरफोडले. जुन्या नरसी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक मेडिकल दुकान फोडण्यात आले आहे. एका टावर कंपनीतून चोरी झाली आहे. नंदकिशोर नरसींगराव उत्तररार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 नोव्हेंबर रोजी ते आपले उस्माननगर रस्त्यावरील घर बंद करून आपल्या मुलीच्या इलाजासाठी पुण्याला गेले. […]