नांदेड

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील अनुसूचित जातीचा अधिकारी आत्महत्येचा विचार करतोय ; सलग दुसऱ्या दिवशी घडला दुसरा प्रकार

नांदेड(प्रतिनिधी)-कालच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या करण्याचा विचार व्यक्त केला होता. सलग दुसऱ्या दिवशी आता तर एका अनुसूचित जातीच्या अधिकाऱ्याने पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड साहेबांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा विचार मनात घुटमळत असल्याबद्दलचे पत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवल्याची चर्चा सुरू झाली आहे. या परिस्थितीत काम करणाऱ्या पोलीस निरिक्षकांना स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती मिळण्याची स्वप्ने सुध्दा पडू लागली आहेत.
कालच एका पोलीस अधिकाऱ्याने पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करून घेण्याचे शब्द वापरले होते. त्यावर त्याच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस उपनिरिक्षक उत्तम दगडूजी बुक्तरे यांनी मध्यस्थी करून त्या पोलीस अधिकाऱ्याची समस्या सोडवली होती. पण काल रात्री उत्तम बुक्तरे यांनी आपण केलेल्या एका अनोळखी मरण पावलेल्या महिलेसंदर्भाच्या आकस्मात मृत्यू प्रकरणातील आपल्या अडचणी घोरबांड यांच्यासमक्ष मांडल्या. त्यावेळी त्यांनी मला सोबत काम करण्यासाठी एक माणसाची आवश्यकता आहे असे सांगितले. याबद्दल कांही तासांपुर्वी एका पोलीस उपनिरिक्षकाची समस्या सोडविण्यामध्ये सहभाग घेवून ती समस्या सोडविण्यात पोलीस निरिक्षकाची मदत करणाऱ्या उत्तम बुक्तरे सोबत मात्र त्यापेक्षा वाईट वागणूक घोरबांड यांनी दिली.
9 ऑक्टोबर रोजी पोलीस उपनिरिक्षक उत्तम बुक्तरे यांची ड्युटी ऑफीसर पदावर रात्रीचे कर्तव्य होते. त्यानुसार त्यांनी आपल्या अडचणी पोलीस निरिक्षकांना सांगण्यासाठी 9 वाजेच्यासुमारास त्यांच्या कक्षात गेले होते. आपल्या समस्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना न सांगता ते कोणाला सांगतील. पण स्थानिक गुन्हा शाखेचे दिवा स्वप्न पाहण्याच्या नादात घोरबांड यांनी उत्तम बुक्तरेला वाईट वागणूक देत ऑफीसच्या बाहेर होण्यास सांगितले. यावेळी पोलीस उपनिरिक्षक आनंद बिच्चेवार, पोलीस अंमलदार मलदौडे, कानगुले, कवठेकर हे पण होते. कांही दिवसांपुर्वीच मुंबईच्या दगडीचाळीतून आदेश निघालेला आहे की, आपल्या मातहत अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलतांना वाईट शब्दांचा वापर करू नये. या आदेशाचेही लक्ष घोरबांड यांना राहिले नाही.

याही पेक्षा वर जात घोरबांड यांनी स्टेशन डायरी क्रमांक 45 वर दि.9 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 22.35 वाजता नोंद केली आहे की, पोलीस उपनिरिक्षक उत्तम बुक्तरे हे गणवेशात असतांना डोक्यावर टोपी न घालता त्यांच्या समक्ष आले. रात्री 20.50 वाजता ते आनंद बिच्चेवार या पोलीस उपनिरिक्षकांकडे प्रलंबित असलेल्या गुन्ह्याची तपासणी करीत होते. त्यावेळी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार मलदौडे, जाधव, लेखणीक पोलीस अंमलदार कवठेकर, कानगुले हे पण उपस्थित होते.तपासासाठी माझ्या मदतीला कोणी देत नाही असे म्हणून उध्दटपणे उत्तम बुक्तरे बोलले, आता तुम्ही बघा मी काय करतो असे म्हणून निघून गेले. भविष्यात उत्तम बुक्तरे आमच्याविरुध्द तक्रार करण्याची शक्यता आहे. बुक्तरेबद्दल आम्ही वरिष्ठांकडे अहवाल पाठवणार आहोत असे या नोंदीत लिहिले आहे.
10 ऑक्टोबर रोजी आपली नाईट ड्युटी संपवून उत्तम बुक्तरे यांनी आपल्याला झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासाची वाक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यासमक्ष मांडली आहे. आज सुट्टी असल्याने कोणीशी प्रत्यक्ष भेट झाली की, नाही याबद्दल माहिती प्राप्त झाली नाही. पण उत्तम बुक्तरे यांनी आपण अनुसूचीत जातीत जन्मलो आहोत याचा उल्लेख आपल्या अर्जात केला आहे. असे हे नांदेड ग्रामीणचे कर्तव्यदक्ष, निस्पृह असे पोलीस निरिक्षक अशोकरावजी घोरबांड असतांना उत्तम बुक्तरे सारख्या अनुसूचित जातीत जन्मलेल्या अधिकाऱ्याला कसा त्रास झाला हा मोठा शोध विषय होवू शकतो.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.