नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील ख्यातनाम वकील ऍड. सय्यद अरिबोद्दीन यांच्या पत्नी सय्यद तबस्सुम यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर आज दुपारी अंतिमसंस्कार करण्यात आले आहे.
चार-पाच दिवसांपुर्वी ऍड. सय्यद अरिबोद्दीन यांच्या पत्नी सय्यद तबस्सुम (48) यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर उपचार झाले. उपचारानंतर त्यांना विश्रांती करण्यासाठी घरी पाठविण्यात आले. काल दि.9 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास जेवण करून सर्व कुटूंब घरात असतांना त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि यात त्यांचे निधन झाले. दरम्यान सय्यद तबस्सुम घरी आल्यानंतर त्यांचे पती ऍड.सय्यद अरिबोद्दीन यांनाही हृदयविकाराचा झटका आला. पत्नीचे निधन झाले तेंव्हा ऍड. सय्यद अरिबोद्दीन रुग्णालयात उपचार घेत होते.
आज सय्यद तबस्सुम यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी अनेक वकील मंडळी, ऍड.अरिबोद्दीन कुटूंबियांचे अनेक हितचिंतक उपस्थित होते.