क्राईम

२९ मार्च प्रकरणात एका गुन्ह्यातील दोन आरोपींना जामीन मंजुर 

नांदेड(प्रतिनिधी)-२९ मार्च रोजी दाखल झालेल्या तीन विविध गुन्ह्यांमधील एका गुन्ह्यातील दोन आरोपींना नांदेडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एन.गौतम यांनी २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर केला आहे.
                           नांदेड शहरात २९ मार्च २०२१ रोजी पोलीसांवर हल्ला केल्याप्रकरणी दोन वेेगवेगळे गुन्हे दाखल झाले होत. तिसरा पण एक गुन्हा दाखल झालेला आहे. यातील गुन्हा क्रमांक ११४/२०२१ या प्रकरणात पलविंदरसिंघ उर्फ प्रिन्स प्रितमसिंघ शाह (२१) या युवकाला २१ जून २०२१ रोजी अटक झाली होती. या प्रकरणात दुसरा युवक कुलदिपसिंघ अंगतसिंघ जुन्नी (२०) या युवकाला २९ जुलै २०२१ रोजी अटक झाली होती. या दोघांच्या अटकेनंतर त्यांच्या संदर्भाने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एन.गौतम यांच्या न्यायालयात झाली.
                      उपलब्ध पुरावा आधारावर न्या.के.एन.गौतम यांनी या दोघांना आज २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर केला आहे. या प्रकरणात पलविंदरसिंघ शाहच्यावतीने ऍड.रमेश परळकर यांनी बाजू मांडली त्यांना ऍड. अमलपालसिंघ कामठेकर आणि ऍड.सरबजितसिंघ शाहु यांनी मदत केली. कुलदिपसिंघच्यावतीेने  ऍड.यदुपत अर्धापूरकर यांनी बाजू मांडली त्यांना ऍड.रामसिंघ मठवाले यांनी मदत केली.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *