क्राईम

सोनखेड पोलीसांनी स्वस्त धान्य भरलेला ट्रकवर गुन्हा दाखल केला

20 दिवसापुर्वी पकडलेला ट्रकचा अद्याप कांही निर्णय झाला नाही
नांदेड(प्रतिनिधी)-20 दिवसात सोनखेड पोलीस ठाण्यात स्वस्त धान्याचे तांदुळ भरलेला दुसरा ट्रक पकडला. त्याविरुध्द नायब तहसीलदार बोरगावकर यांच्या तक्रारीवरुन जीवनावश्यक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण 20 दिवसापुर्वी पकडलेल्या ट्रकवर आजपर्यंत महसुल विभागाने तक्रार दिलेली नाही.
20 दिवसापुर्वी नांदेड-लोहा रस्त्यावर एका खाजगी चार चाकी गाडीने एम.एच.26 ए.डी.1339 क्रमांकाचा ट्रक रोखला. त्या ट्रकमध्ये स्वस्त धान्याचा तांदुळ होता. हा ट्रक त्यावेळी पोलीस ठाणे सोनखेड येथे आणण्यात आला.सोबतच लोहाच्या महसुल कार्यालयातील अधिकारी आले आणि या ट्रकमधील तांदळाचे नमुने तपासणीसाठी पाठविले. त्या संदर्भाने आजपर्यंत कोणतीही तक्रार महसुल विभागाने दिलेली नाही. तो ट्रक पोलीस ठाणे सोनखेडच्या समोर उभा आहे.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि.6 ऑक्टोबर रोजी लोहा शहरातून नांदेडकडे येणाऱ्या एका ट्रकची छोटीशी धडक कोणाला तरी लागली. त्यात कांही नुकसान झाले नाही पण धडक देणारा ट्रक पुढे निघून आला. त्याने तो लोहा-सोनखेड रस्त्यावर एका जागी उभा करून स्वत: पळ काढला. कारण ज्या माणसाला धडक लागली होती. तो माणूस त्या ट्रकचा पाठलाग करत होता. त्यानंतर लोहा-तहसील कार्यालयातील अधिकारी, असंख्य नागरीक या ट्रकजवळ जमले आणि नंतर हा ट्रक लोहा पोलीस ठाण्यात आणण्यात आला. या ट्रकवर पुढच्या भागात कोणताही नोंदणी क्रमांक लिहिलेला नाही. तसेच मागच्या बाजूला असलेल्या नंबर प्लेटवरील एम.एच.12 डी.एवढेच आकडे दिसतात बाकीचे आकडे ओळखू येत नाहीत.
या ट्रक संदर्भाने लोहाचे नायब तहसीलदार बोरगावकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जीवनावश्यक वस्तु कायदा यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास लोहाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर हे करीत आहेत. नंबर नसलेला ट्रक रस्त्यावर वाहतुक करतो आहे आणि कोणीच त्याला कांही विचारत नाही ही या भारतातील एक मोठी दुर्देवाची घटना आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *