नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरिक्षकांनी आपल्या मातहतांना तोंडी आदेशाने कार्यरत पोलीस निरिक्षक दर्जातील वर्ग-1 चे अधिकारी देत असलेल्या त्रासामुळे पोलीस दलात पसरणारा असंतोष पाहायला हवा. ज्या अधिकारी आणि अंमलदारांना त्रास होत आहे. त्यांच्यासाठी सुध्दा आपणच कुटूंब प्रमुख आहात या भावनेतून त्यांची दृष्टी आपल्याकडे लागलेली आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयाजवळ तोंडी आदेशाने कार्यरत असलेल्या पोलीस निरिक्षकांच्या हालचाली नेहमीच पोलीस उपमहानिरिक्षकांपर्यंत पोहचत असतात. तोंडी आदेश असतांना सुध्दा त्यांनी चालवलेली हुकूमशाही त्यांच्यासोबत काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना तसेच सर्वसामान्य जनतेला जाचक ठरत आहे.
आज दि.8 ऑक्टोबर रोजी सुध्दा या अत्यंत पारदर्शक, निष्पक्ष, आपल्या कर्तव्याला आपले जीवन माणनारे हे व्यक्तीमत्व या परिस्थितीत आले की, त्यांच्या सोबत काम करणाऱ्या एका माणसाने आत्महत्या करण्याचा विचार बोलून दाखवला. सध्या नवोदित असलेल्या या व्यक्तीला पाठराखण मिळण्याऐवजी त्याला असे बोलण्याची बारी का आली हा मोठा गंभीर विषय आहे. आज पोलीस ठाण्यात हजर असलेल्या इतरांनी त्यात हस्तक्षेप केल्यामुळे हा प्रकार टळला अशी चर्चा आहे. यानंतर तोंडी आदेशाच्या साहेबांनी त्या व्यक्तीसोबत दुसरा व्यक्ती कायमचा काम करण्यासाठी देण्यात यावा असे आदेश दिले.
पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, पोलीस अंमलदार यांच्यासोबत एक व्यक्ती दिलाच जातो. मग त्या माणसासोबत कोणताही व्यक्ती कामात नसेल तर तो एकटा सर्व काम कसे करेल या त्रासातून घडलेला हा प्रकार दुर्देवी आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक हे चार जिल्ह्याच्या पोलीस दलाचे प्रमुख आहेत. त्यांच्याकडे पाहतांना प्रत्येक पोलीस अधिकारी आणि अंमलदाराला ते आपले सर्व काही आहेत याच दृष्टीकोणातून पाहावे लागते. पोलीस उपमहानिरिक्षक साहेबांनी अशा संदर्भाने कायम तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
