नांदेड

नांदेडचे महापौरपद काँग्रेसचेच;पण कोणाच्या नशिबात ?

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे महापौर पद रिकामे झाल्यानंतर नवीन महापौर निवडीची अधिसुचना मनपाचे नगर सचिव सरदार अजितपालसिंघ संधू यांनी जारी केली आहे. निवडणुक कार्यक्रम जाहिर झाला असला तरी महापौर पद काँग्रेस सदस्यालाच मिळणार असल्याचे निश्‍चित आहे.
                                  विद्यमान महापौर मोहिनी येवनकर यांनी ३० सप्टेंबर २०२१ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. महापौर पदाचा कालावधी अडीच वर्षाचा होता पण आता नवनियुक्ती महापौरांचा कार्यकाळ अडीच वर्षातील उर्वरीत कालावधीसाठी आहे. नामनिर्देशन पत्र वितरीत करण्यासाठी ९ ऑक्टोबर सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत वितरीत होतील. त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारले जातील. महानगरपालिकेतील पहिला मजला कक्ष क्रमांक ११८ मध्ये नगरसचिव कार्यालयात महापौर पदाची नामनिर्देशन पत्रे स्विकारली जातील. १३ ऑक्टोबर रोजी महापौर निवडीसाठी निश्‍चित करण्यात आलेल्या विशेष सभा सुरू झाल्यानंतर पिठासीन अधिकारी करतील. त्यानंतर १५ मिनिटात लेखी निवेदनाद्वारे नामनिर्देशनपत्र परत घेता येतील. एका उमेदवाराला चार पेक्षा अधिक नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्र सुचित आणि अनुमोदित करतांना एका सदस्याला एकाच उमेदवारासाठी हे करता येईल. त्यानंतर निवडणूक घेण्याची वेळ आली तर हातवर करून मते मोजली जातील आणि महापौर निवडीची घोषणा होईल.
                               महापौर निवडणुकीची प्रक्रिया जाहिर करण्यात आली असली तरी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर पदावर कोंग्रेस पक्षाचे सदस्यच निवडूण येतील यात शंका नाही. सदस्याचे महापौर पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. त्यात कोणाचा नंबर लागेल आणि ती भाग्यवान कोण ठरेल हे पाहण्यासाठी कांही काळ वाट पाहावी लागणार आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *