क्राईम

पोलीसांनी कांही चोरटे पकडले तरीपण चोऱ्या कांही थांबेनात

नांदेड(प्रतिनिधी)-5 ऑक्टोबरच्या रात्री दोन ठिकाणी बारमध्ये घुसून जबरी चोरी करणाऱ्या कांही दरोडेखोरांना पोलीसांनी पकडले. पण 5 ऑक्टोबर आणि 6 ऑक्टोबर रोजी दोन नवीन जबरी चोरीचे गुन्हे घडले आहेत. सोबतच 4 घरफोडीचे गुन्हे, मोटारसायकल चोरीचे 3 गुन्हे आणि चोरीचे 2 गुन्हे असे एकूण 11 चोरी प्रकार पोलीस दप्तरी दाखल झाले आहेत. या सर्व चोरी प्रकारांमध्ये मिळून एकून 2 लाख 23 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबला आहे.
कांही तासातच जबरी चोरी करणारे कांही गुन्हेगार शिवाीनगर पोलीसांनी पकडले. त्याच रात्री 5 ऑक्टोबरला लोकमान्य मंगल कार्यालयाच्या पाठीमागे चार जणांनी बालाजी एकनाथराव पावडे यांना पकडून त्यांनाखाली पाडून मारहाण करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम आणि एक मोबाईल असा 16 हजार 300 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक सोनकांबळे हे करीत आहेत.
6 ऑक्टोबरच्या पहाटे 6 वाजेच्यासुमारास ऑक्सफर्ड शाळा, निळा रोड रस्त्यावर अर्चना रमेशचंद्र हराळे या आपल्या पतीसोबत मॉर्निंग वॉक करत असतांना 3 दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे शॉर्ट गंठण बळजबरीने चोरून नेले आहे. शॉर्ट गंठणची किंमत 30 हजार रुपये आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक कदम हे करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामनगर सिडको येथे राहणाऱ्या प्रेमला भिमाराव सांगवीकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान त्या आपल्या मुली व नातीकडे स्वस्तीकनगर नांदेड येथे गेल्या होत्या. या दरम्यान कोणी तरी चोरट्यांनी त्यांचे घरफोडून त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा 40 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसंानी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गव्हाणकर अधिक तपास करीत आहेत.
सुमित दिनकरराव चाडावार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 ऑक्टोबरच्या रात्री 10 ते 6 ऑक्टोबरच्या पहाटे 7 वाजेदरम्यान आशिर्वाद सुपर मार्केट किनवट येथील त्यांच्या दुकानाचे शटर उचकून त्यातील रोख रक्कम 1200, काजूचे पॉकिट1200 व बदाम 1 किलो 1 हजार रुपयांचे असा 34 रुपयांचा ऐवज चोरला आहे. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक पवार हे अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून, मुखेड शहरातून आणि नाथनगर नांदेड भागातून 3 जणांच्या 1 लाख 10 हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. सोबतच रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालाजी श्रीराम बादवाड यांच्या खिशातून मोबाईल व रोख रक्कम असा 13 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. मुदखेड येथे टेन्ट दुकानासमोर ठेवलेले लोखंडी पाईप चोरीला गेले आहेत. हिमायतनगर जवळ जवळगाव पुलापाशी ठेवलेले सेंट्रींगचे 45 पाईप चोरीला गेले आहेत. असे भरपूर गुन्हे पोलीस दप्तरी दाखल आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.