नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड अर्धापूर रस्त्यावरील आसना पुलाजवळ दुचाकी गाडी आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात पुरूष मरण पावला आहे आणि त्यांच्या पत्नी जखमी आहेत.
आज दि.6 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेच्यासुमारास मोटारसायकल क्रमांक एम.एच.26 झेड.0760 आणि ट्रक क्रमांक एम.पी.09 एच.एफ.7931 या दोन वाहनांचा अपघात झाला त्यात मोटारसायकल चालक तुळशीराम बालाजी पुरी (35) यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी कल्पना पुरी (30) यांना किरकोळ मार लागला आहे. हे दोघे पती-पत्नी बारड येथील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीसांचे पथक ज्यात पोलीस अंमलदार शिंदे, वडजे, कात्रे व सेवक वसंत शिनगारे यांनी घटनास्थळी धाव घेवून 15 मिनिटातच जखमी असलेल्या कल्पना तुळशीराम पुरी यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे.
